अजमेर ऊर्ससाठी सहा विशेष रेल्वे 

railway
railway

नांदेड : अजमेर येथील ८०७ व्या उरसास (ऊर्स) जाण्याकरिता दक्षिण मध्य रेल्वेच्या वतीने भाविकांची गैरसोय टळावी यासाठी सहा विशेष रेल्वे गाड्या चालविण्यात येणार असल्याचे प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे. 

नांदेड- अजमेर- मदार- अजमेर- नांदेड ही (०७६४१) विशेष गाडी ता. ११ मार्च रोजी नांदेड येथून सायंकाळी १६. ५० वाजता सुटेल आणि पूर्णा, बसमत, हिंगोली, वाशीम, अकोला, अजमेर मार्गे मदार जंक्शन येथे दुसऱ्या दिवशी  रात्री २२. ५०  वाजता पोहोचेल.

परतीच्या प्रवासात गाडी संख्या (०७६४२) अजमेर ते नांदेड विशेष गाडी ता. १६ रोजी रात्री १९.२५ वाजता मदार जंक्शन येथून सुटेल आणि नांदेड येथे ता. १८ मार्च रोजी सकाळी पाच वाजता पोहोचेल.

या गाडीला एकूण १८ डब्बे आहेत.

गाडी संख्या ०७१२९ - ०७१३  काचीगुडा - अजमेर- काचीगुडा ही गाडी काचीगुडा येथून ता. १० मार्च रोजी रात्री २३. ३० निघेल आणि नांदेडला ता. ११ वाजता पोहचेल.  नांदेड येथून ५. २० वाजता सुटून अकोला मार्गे अजमेर येथे ता. १३ मार्च  रोजी सकाळी साडेअकरा वाजता अजमेरला पोहोचेल.

परतीच्या प्रवासात गाडी संख्या (०७१३०) मदार येथून ता. १६ मार्च रोजी सायंकाळी अजमेर येथून १७. ४० वाजता सुटेल आणि ता. १८ मार्च रोजी काचीगुडा येथे तीन वाजता पोहोचेल. या गाडीला १७ डब्बे असतील .

गाडी संख्या ०७१२५- ०७१२६ हैदराबाद - अजमेर – हैदराबाद ही गाडी संख्या ०७१२५ हैदराबाद ते अजमेर एक्सप्रेस हैदराबाद येथून ता. १० मार्च रोजी रात्री २० वाजता निघेल आणि नांदेड, हिंगोली, अकोला मार्गे अजमेर येथे ता. १२ मार्च रोजी सकाळी ३. ४० वाजता पोहोचेल.

परतीच्या प्रवासात गाडी संख्या ०७१२६ अजमेर ते हैदराबाद ही गाडी अजमेर येथून ता. १५ मार्च रोजी रात्री २३. २५ वाजता निघेल आणि उज्जैन, खांडवा, अकोला, हिंगोली, नांदेड मार्गे हैदराबाद येथे ता. १७ मार्चला सकाळी १० वाजता पोहोचेल. या गाडीला १८ डब्बे असतील. अजमेर जाणाऱ्या भक्तांनी व प्रवाशांंनी या सर्व गाड्यांचा लाभ घ्यावा असे आवाहन दक्षिण मध्य रेल्वे नांदेड विभागाचे जनसंपर्क अधिकारी राजेश शिंदे यांनी केले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com