
Beed Crime News : धक्कादायक प्रकाराने बीड हादरलं! चॉकलेटचं आमिष दाखवून वृद्धाचा चिमुरडीवर अत्याचार
बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथे एका अवघ्या सहा वर्षीय चिमुरडीला चॉकलेटचे अमिष दाखवत एका ६० वर्षाच्या वृद्धाने अत्याचार केल्याचा संतापजनक प्रकार घडला आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार बीडच्या अंबाजोगाई तालुक्यात ६ वर्षीय चिमुकलीला चॉकलेट देतो असे सांगून एका वृध्दाने आत्याचार केले. या प्रकरणी बर्दापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यानंतर त्या वृद्धाला ताबडतोब अटक करण्यात आली आहे.
घडलेल्या घटनेबद्दल पोलिसांनी माहिती दिली आहे. त्यानुसार शाळेत पहिलीच्या वर्गात शिकणारी चिमुरडी शाळेतून घरी आली. त्यानंतर ती खेळायला गेली. रात्री कोणालाही काही न बोलता ती शांत बसून होती त्यामुळें आईःवडिलांनी तिची विचारपूस केली असता तिने पोट दुखत असल्याचे सांगितले. दुसऱ्या दिवशीही पोट दुखत असल्याने तिच्या वडिलांनी मुलीला विश्वासात घेऊन विचारले. त्यानंतर हा धक्कादायक प्रकार समोर आला.
मुलीने सांगितले की ती मैत्रीणीसोबत खेळत असताना आरोपी तिथे आला आणि चल तुला चॉकलेट देतो अशे आमिष दाखवून तिला जुन्या घरात नेत चिमुकलीवर अत्याचार केला. तसेच पीडितेला जीवे मारण्याची धमकी देखील दिली. या प्रकरणी पीडितेच्या वडिलांच्या फिर्यादीवरून आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.