पथदिव्यांची ६१ कोटी थकबाकी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 15 एप्रिल 2018

जालना - जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांकडे पथदिव्यांचे तब्बल ६१ कोटी ३७ लाख ७४ हजार ९२१ रुपये थकीत आहेत. ही थकबाकी वसूल करण्याचे महावितरणपुढे आव्हान आहे.

जालना - जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांकडे पथदिव्यांचे तब्बल ६१ कोटी ३७ लाख ७४ हजार ९२१ रुपये थकीत आहेत. ही थकबाकी वसूल करण्याचे महावितरणपुढे आव्हान आहे.

महावितरण कंपनीकडून थकीत वीजबिलाची वसुली सुरू आहे; मात्र जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांकडे पथदिव्यांची कोट्यवधी रुपयांची थकबाकी आहे. जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पथदिव्यांची एक हजार ७१५ जोडणी आहेत. या एक हजार ७१५ वीजजोडणीचे मार्च २०१८ अखेर चार कोटी ६९ लाख १४ हजार ३५ रुपयांची वसुली केली आहे; मात्र सद्यःस्थितीमध्ये या स्थानिक स्वराज्य संस्थांकडे ६१ कोटी ३७ लाख ७४ हजार ९२१ रुपये थकीत आहेत. त्यामुळे बहुतांश पथदिव्यांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. तरीदेखील स्थानिक स्वराज्य संस्थांकडून वीजबिलाचा भरणा झालेला नाही, हे विशेष. ही थकबाकी वसूल करणे महावितरणसमोर एक आव्हान आहे.

Web Title: 61 crores outstanding for street lights

टॅग्स