लातूर जिल्ह्यात 61.85 टक्के मतदान

प्रतिकात्मक छायाचित्र
प्रतिकात्मक छायाचित्र

लातूर ः लातूर जिल्ह्यातील सर्व सहा विधानसभा मतदारसंघांत सरासरी 61.85 टक्के मतदान झाले आहे. जिल्ह्यातील एकूण 19 लाख 13 हजार 16 पैकी 11 लाख 83 हजार 175 मतदारांनी दोन हजार 13 मतदान केंद्रांवर मतदानाचा हक्क बजावला. 


लातूर जिल्ह्यात सहा विधानसभा मतदारसंघासाठी सोमवारी दोन हजार 13 मतदान केंद्रांवर मतदान झाले. सकाळच्या वेळी पाऊस राहिल्याने त्याचा मतदानावर परिणाम झाला; पण दुपारी बारानंतर मात्र मतदान केंद्रांवर गर्दी वाढली. ती मतदान संपेपर्यंत कायम राहिली. 


लातूर ग्रामीणमध्ये एकूण तीन लाख 21 हजार 972 पैकी एक लाख 99 हजार 36 मतदारांनी मतदान केले. याची टक्केवारी 61.82 इतकी आहे. 
लातूर शहरमध्ये तीन लाख 72 हजार 369 पैकी दोन लाख 10 हजार 452 मतदारांनी मतदान केले. याची टक्केवारी 56.72 इतकी आहे. 
अहमदपूरमध्ये तीन लाख 20 हजार 483 पैकी दोन लाख 13 हजार सात मतदारांनी मतदान केले. याची टक्केवारी 66.46 इतकी आहे. उदगीरमध्ये दोन लाख 98 हजार 439 पैकी एक लाख 77 हजार 983 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. याची टक्केवारी 59.64 इतकी आहे.

निलंग्यामध्ये तीन लाख 16 हजार 292 पैकी एक लाख 96 हजार 241 मतदारांनी मतदान केले. याची टक्केवारी 62.04 इतकी आहे. तर औशामध्ये दोन लाख 83 हजार 461 पैकी एक लाख 86 हजार 456 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. याची टक्केवारी 65.78 इतकी आहे. \


जिल्ह्यातील 19 लाख 13 हजार 16 पैकी 11 लाख 83 हजार 175 मतदारांनी मतदान केले. यात सहा लाख 30 हजार 847 पुरुष, तर पाच लाख 52 हजार 327 महिलांनी मतदानाचा हक्क बजावला. पुरुषांच्या मतदानाची टक्केवारी 62.46, तर महिलांच्या मतदानाची टक्केवारी 61.17 इतकी राहिली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com