64 व्या कृषी संशोधन समितीच्या बैठकीस सुरवात

aurangabad
aurangabad

औरंगाबाद - वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठांतर्गत विभागीय कृषी संशोधन व विस्तार सल्लागार समितीच्या (रब्बी हंगाम) 64 वी बैठकीस (झेड आरइएसी, रब्बी) सोमवारी (ता.24) औरंगाबादेतील राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्पाच्या सभागृहात सुरवात झाली. 

बैठकीत मागील रब्बी हंगामात मराठवाड्यातील पिकांसंदर्भात उद्भवलेल्या समस्या कृषी विभागातर्फे मांडण्यात येणार असून, त्यावर कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञातर्फे समस्यांच्या अनुषंगाने यंदा करावयाचे उपाय सुचविले जाणार आहेत. बैठकीला विद्यापीठाचे कुलगुरू डॉ अशोक ढवण, संशोधन संचालक डॉ दत्तप्रसाद वासकर, शिक्षण विस्तार संचालक पी जी इंगोले, औरंगाबाद विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयाचे कृषी अधिकारी यांच्यासह आठही जिल्ह्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, विद्यापीठाचे शास्त्रज्ञ उपस्थित आहेत. 

कुलगुरू म्हणाले ....
यश, अपयशाचा विचार करत बसण्यापेक्षा दुष्काळजन्य परिस्थितीत पिके कशी जगावता येतील यावर भर देऊन शेतकऱ्यांना आत्मविश्वास देणे आवश्यक आहे. तसेच सध्या वाढत असणारे पाण्याचे दुर्भिक्ष्य लक्षात घेऊन फळबागाचे उत्पादन घेण्याऐवजी अशा परिस्थितीत किमान फळबागा जगविण्याची शेतकऱ्यांची मानसिकता बनवावी लागेल. कारण पोटच्या लेकरांप्रमाणे जपलेल्या 15 -20 वर्षांच्या बागा तोडण्याची वेळ येता कामा नये. 

फळबागा वाचवा अभियान
विद्यापीठाच्या अंबाजोगाई येथील सीताफळ संशोधन केंद्रातर्फे 50 ते 60 हजार कलमे तयार केल्याचे संचालक संशोधन डॉ दत्तप्रसाद वासकर यांनी कृषी अधिकाऱ्यांना सांगताच फुंडकर फळबाग योजनेंतर्गत अर्ज केलेले शेतकरी खासगी कंपनीने तयार केलेली कलमे मागतात पण जीआर मध्ये हे बसत नसल्याचे एका कृषी अधिकाऱ्याने सांगितले. त्यावर कुलगुरू डॉ ढवण यांनी पावसाळा बघा, आणि निर्णय घ्या, पावसाळा संपत आला तरी पाऊस नाही हे लक्षात घेऊन 2012-13 मध्ये सुरू केले तसे यंदाही फळबागा वाचवा अभियान हाती घ्यावे त्याचीही तयारी ठेवण्याचा सल्ला दोन्ही अधिकाऱ्यांना दिला.

बैठकीत नाचले नुसते आकडे
बैठकी दरम्यान यंदाच्या रब्बी हंगामातील पिकांसंदर्भात आकडेवारीचे आकडे नाचले मात्र पाऊसच नाही तर आकडे कितपत उपयोगी ठरतील असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com