
माचरटवाडी येथील एका 65 वर्षीय व्यावसायिकाचा पाण्यात आढळला मृतदेह
शिरूर अनंतपाळ (लातूर) : माचरटवाडी (ता.निलंगा) येथील एका 65 वर्षीय किराणा दुकान व्यावसायिकाच्या पाठीला दगड बांधलेल्या अवस्थेत नदीच्या पात्रात मृतदेह आढळला. शिरूर अनंतपाळ पोलिस ठाण्याच्या अंतर्गत येणाऱ्या निटूर पोलिस चौकीत अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे. ही आत्महत्या की हत्या याबाबत अद्याप स्पष्टता झाली नसून पोलिस तपास करीत आहेत.
मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!
तालूक्यातील माचरटवाडी येथील किराणा दुकान व्यवसायीक शिवाजी नागिमे (वय65) मागील चार दिवसापासून गायब होते. त्यांच्या कुटुंबियाकडून नातेवाईकांसह इकडे तिकडे पाहिले. सर्वत्र शोधाधोध झाली. पण शोध लागलाच नाही. शेवटी निटूर पोलिस चौकीत या प्रकाराची तक्रार देण्यात आली. पोलिसांकडूनही तपास सुरु होता.
औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
पण मांजरा नदीच्या पात्रात शिवाजी नागणे यांचा मृतदेह पाठीला दगड बांधलेल्या अवस्थेत शुक्रवारी (ता.30) रोजी आढळून आला. निटूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्र शवविच्छेदन करण्यात आले. या घटनेनंतर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली. मात्र, पाठीला दगड बांधून मृतदेह आढळून आल्याने संशयास्पद मृत्यू झाल्याची गावात चर्चा रंगली आहे. मुळात ही आत्महत्या की हत्या झाली आहे. याबाबत पोलिसांकडून तपास सुरु झाला आहे. शिवाजी नागीमे यांच्या पश्चात पत्नी एक मुलगा दोन मुली असा परिवार आहे.
देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
(Edited By Pratap Awachar)