वाळूजमध्ये आढळले ६५० बालकामगार

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 4 जून 2018

वाळूज - राष्ट्रीय बालकामगार प्रकल्पांतर्गत बालकामगारांचे सर्वेक्षण केले जात आहे. यात येथे तीन दिवसांत तब्बल ६५० बालकामगार आढळून आले आहेत. त्यामुळे बालकामगार असलेल्या अनेक कंपन्यांचे धाबे दणाणले आहेत.

वाळूज - राष्ट्रीय बालकामगार प्रकल्पांतर्गत बालकामगारांचे सर्वेक्षण केले जात आहे. यात येथे तीन दिवसांत तब्बल ६५० बालकामगार आढळून आले आहेत. त्यामुळे बालकामगार असलेल्या अनेक कंपन्यांचे धाबे दणाणले आहेत.

या मोहिमेंतर्गत हे सर्वेक्षण करण्यासाठी प्रगणक, समन्वयक आणि स्थानिक सहयोगी संस्थांचे पथक तयार करण्यात आले आहे. हे पथक वाळूज औद्योगिक परिसरातील वाळूज, पंढरपूर, कासोडा, एकलहेरा, लिंबेजळगाव, नांदेडा, विटावा, जोगेश्वरी, घाणेगाव, नारायणपूर, पिंपरखेडा, रांजणगाव (शेणपुंजी), वडगाव (कोल्हाटी), बजाजनगर, कमळापूर, शिवराई, तीसगाव आणि लांझी आदी परिसरातील कंपन्या, हॉटेल, रसवंतीसह विविध दुकानांवर कामे करणाऱ्या बालकामगारांचे सर्वेक्षण करण्यात येत आहे. ३१ मेपासून सुरू झालेली ही मोहीम ७ जूनपर्यंत राबविण्यात येणार आहे. पहिल्या तीन दिवसांत या पथकाला तब्बल ६५० बालकामगार आढळले आहेत. त्यांच्या सर्वेक्षणासाठी पंढरपूर येथील बहुजन जाती-जमाती कामगार सेवाभावी संस्था, उत्कर्ष बहुउद्देशीय सेवाभावी संस्था कार्य करीत असून, त्यांना महाविद्यालयीन विद्यार्थी वर्षा कुरुडे, कावेरी कोकाटे, शोभा घुले, मनीषा म्हस्के, ज्ञानेश्वर सुरासे, दत्ता सोळंके, प्रमोद वाघ, बाळासाहेब शेंडगे, लक्ष्मीकांत बनकर, अविनाश थोरात आदींची मदत मिळत आहे.

पोलिसांना मागितले सहकार्य
या पथकाने एमआयडीसी पोलिसांना पत्र देऊन परिसरात असलेल्या बालकामगारांच्या सर्वेक्षणास सहकार्य करण्याची मागणी केली. यावेळी सहायक फौजदार नामदेव सुरडकर, पोलिस हेडकॉन्स्टेबल वसंत जिवडे, बाळासाहेब आंधळे, जिल्हा समन्वयक ज्ञानेश्वर हनवते, एनजीओ संजय मिसाळ, समन्वयक कुमार भोरे, अभिजित कुलकर्णी, धनंजय डोमाळे, एजाज खान, मतीन शेख, संतोष हिवराळे आदींची उपस्थिती होती. 

Web Title: 650 child worker in waluj