पोलिसांच्या छाप्यात 67 हजारांचा देशी दारूचा साठा पकडला

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 22 सप्टेंबर 2019

बेकायदा देशी दारू विक्री करण्यासाठी घेऊन जाताना पैठण पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात 67 हजार 742 रुपयांच्या देशी दारूचा साठा पकडला. ही घटना शनिवारी (ता. 21) राहटगाव ते सोलनापूर या रस्त्यावर घडली. या प्रकरणी पोलिसांनी दोन संशयित आरोपींना अटक केली आहे.

पैठण (जि.औरंगाबाद) : बेकायदा देशी दारू विक्री करण्यासाठी घेऊन जाताना पैठण पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात 67 हजार 742 रुपयांच्या देशी दारूचा साठा पकडला. ही घटना शनिवारी (ता. 21) राहटगाव ते सोलनापूर या रस्त्यावर घडली. या प्रकरणी पोलिसांनी दोन संशयित आरोपींना अटक केली आहे.

मदनलाल मोहनलाल जैस्वाल (रा. विहामांडवा, ता. पैठण) व राजेश चंदन साबळे (रा. साष्टपिंपळगाव, ता. अंबड, जि. जालना) अशी या संशयितांची नावे आहेत. देशी दारूच्या बाटल्यांचे बॉक्‍स बेकायदेशीर विक्रीसाठी घेऊन जात असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिस निरीक्षक भगीरथ देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार सचिन सानप, रामकृष्ण सागडे यांनी पोलिस पथकासह राहटगाव-सोलनापूर रस्त्यावर देशी दारूचे बॉक्‍स असलेल्या रिक्षावर छापा टाकला असता त्यात हा देशी दारूचा साठा आढळून आला. पोलिसांनी तत्काळ कारवाई करीत हा साठा जप्त करून संशयित आरोपींना ताब्यात घेतले. पोलिस कॉन्स्टेबल लालचंद नागलोत, ज्ञानेश्वर भुरके, चरण बालोदे, प्रमोद म्हसकर, सचिन आगलावे, वाल्मीक बेळगे, भाऊसाहेब वैद्य, कल्याण ढाकणे यांनी कारवाई केली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 67 Thousand Rupee Country Made Liquor Stock Seized