कृष्णा खोऱ्याचे सात टिमएसी पाणी बीड जिल्ह्याला मिळणार : फडणवीस

प्रविण फुटके
सोमवार, 3 जून 2019

परळी (जि. बीड) : कृष्णा खोऱ्याचे सात टिमएसी पाणी लकवरच बीड जिल्ह्याला मिळेल. या योजनेला मंजूरीही देण्यात आली आहे. इस्त्राईल सरकारसोबत वॉटरग्रीड करार केला असून या माध्यमातून नद्याजोड प्रकल्प राबवून मराठवाडा दुष्काळमुक्त करु आणि प्रत्येक ग्रामपंचायतींना पाईपलाईनद्वारे शुद्ध पाणी पुरवठा केला जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. 
दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या स्मृती दिना निमित्त सोमवारी (ता. तीन) परिसरातील गोपीनाथगडावर आयोजित अभिवादन कार्यक्रमात फडणवीस बोलत होते.

यावेळी विधानसभाध्यक्ष हरिभाऊ बागडे, केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, दुग्धविकास मंत्री महादेव जानकर, संयोजक तथा ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्यासह भाजप नेत्यांची उपस्थिती होती. 

फडणवीस म्हणाले, राज्यातील भाजपच्या यशामागे गोपीनाथराव मुंडेंचे परिश्रम आहेत. मराठवाड्यातील लोकसभेच्या सर्व जागा जिंकण्याचे त्यांचे स्वप्न होते. पण, आम्ही केवळ एक जागा चार हजार मतांच्या फरकाने गमावली असली तरी सात जागा जिंकल्या आहेत. गोपीनाथराव मुंडेंचे नेतृत्व मान्य करणाऱ्यांना आणि त्यांचे स्वप्न पुर्ण करणाऱ्यांनाच त्यांचे नाव घेण्याचा अधिकार आहे. आम्ही त्यांचे मानसपुत्र असल्याने आम्हीही त्यांचे नाव लाऊ असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. यावेळी हरिभाऊ बागडे, पंकजा मुंडे, रावसाहेब दानवे, रणजीतसिंह नाईक निंबाळकर, सुजय विखे, बंडू जाधव यांची भाषणे झाली. यावेळी प्रितम मुंडे यांच्यासह महायुतीच्या खासदारांचा सत्कार करण्यात आला. तत्पुर्वी रोजगार मेळाव्याचे उद॒घाटन आणि लाभार्थींना शासकीय मदतीचे वाटप देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 7 TMC Water supplies to Beed district from Krishna Khore