महापालिकेवर  ७५० कोटींच्या  बिलांचा बोजा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 13 जून 2018

औरंगाबाद - तिजोरीत खडखडाट असताना महापालिकेचे चालू आर्थिक वर्षाचे बजेट सोमवारी (ता. ११) तब्बल १८६४ कोटींपर्यंत फुगविण्यात आले. गेल्या काही वर्षांत करण्यात आलेल्या विकासकामांची तब्बल ७५० कोटींची देणी महापालिकेला असून, त्यातील १०० कोटींचे धनादेश तयार आहेत; तर ६५० कोटींचे बिले प्रक्रियेत आहेत. सध्याच्या आर्थिक स्थितीचा विचार केल्यास महिन्याला सरासरी केवळ तीन कोटींचीच बिले महापालिका कंत्राटदाराला देऊ शकते. त्यामुळे बजेटमध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या सुमारे एक हजार कोटींच्या कामांवर प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे. 

महापालिकेच्या तिजोरीत गेल्या काही वर्षांपासून खडखडाट आहे. जीएसटीची (वस्तू व सेवा कर) शासनाकडून मिळणारी ठराविक रक्‍कम वगळली तर कर्मचाऱ्यांचे वेतन करण्यासाठीदेखील महापालिका हतबल असल्याचे चित्र आहे. असे असताना दरवर्षी अर्थसंकल्प फुगवून विकासकामांचे गाजर जनतेला दाखविले जाते. पुढे हीच कामे स्पीलमध्ये (जुनी कामे) येतात. पाच-पाच वर्षे स्पीलमधील कामेही होत नसल्याची अनेक प्रकार समोर आले असताना बजेट फुगविण्याचे प्रकार सुरूच आहेत. यंदाचे बजेट आधीच प्रशासनाने फुगविले. त्यात स्थायी समितीने दोनशे कोटी ५० लाख रुपयांची वाढ केली होती. त्यामुळे बजेट १,४७५ कोटी ८७ लाखांवर गेले. स्थायी समितीनंतर सर्वसाधारण सभेने त्यात ३८८.८० कोटींची भर टाकून कहर केला. त्यासाठी अवाच्या सव्वा उत्पन्नाचे उद्दिष्ट वाढवून देण्यात आले आहे. सुमारे एक हजार कोटींनी बजेट फुगविण्यात आल्याने ही कामे होणार का? असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या काही वर्षांत करण्यात आलेल्या विकासकामांची तब्बल ७५० कोटींची देणी महापालिकेला आहे. त्यातील १०० कोटींचे धनादेश वाटपाच्या प्रतीक्षेत आहेत तर ६५० कोटींची बिले प्रक्रियेत आहेत. सध्याच्या आर्थिक स्थितीचा विचार केल्यास महिन्याला सरासरी तीन कोटींचीच बिले महापालिका कंत्राटदाराला देऊ शकते, असे सूत्रांनी सांगितले. 

विभाग    यंदाचे उद्दिष्ट    गतवर्षीचे उत्पन्न 
मालमत्ता कर    ४५० कोटी    ८० कोटी ६६ लाख 
नगररचना विभाग    २२० कोटी    ६० कोटी ५१ लाख 
अग्निशमन विभाग    ७.२५ कोटी    १ कोटी ९३ लाख

Web Title: 750 crores of bills for the corporation