औरंगाबाद; परतीच्या पावसाने जिल्ह्यात 80 टक्‍के मक्‍याचे नुकसान

औरंगाबाद; परतीच्या पावसाने जिल्ह्यात 80 टक्‍के मक्‍याचे नुकसान

औरंगाबाद: जिल्ह्यात परतीच्या पावसाचा फटका खरीप हंगामातील पिकांना बसला आहे. यात जिल्ह्यातील प्रमुख पीक असलेल्या मक्‍यावर सर्वाधिक परिणाम झाला. आधी लष्करी अळीचा हल्ला मका पिकांवर झाला. त्यातून वाचलेल्या मक्‍याचे अवकाळी पावसामुळे नुकसान झाले. जिल्ह्यातील 80 टक्‍के पिके हातून गेली आहेत. शिवाय बाजार समितीला मका व इतर अन्य धान्यांतून कोट्यवधी रुपयांच्या महसुलाला मुकावे लागणार आहे. 

औरंगाबाद जिल्हा मका पिकासाठी सर्वत्र ओळखला जातो. यंदा सुरवातीला लष्करी अळीचा मका पिकावर प्रार्दुभाव झाला होता. यात सिल्लोड तालुका सर्वाधित बाधित झाला होता. शेतकऱ्यांनी हजारो रुपये खर्च करून या रोगावर नियंत्रण आणले. त्यामुळे काही प्रमाणात मका हाती लागेल असे वाटले होते; मात्र परतीच्या पावसाने मका पिकाचे सर्वाधिक नुकसान झाले. अनेक ठिकाणी मक्‍याला कोंब आले. 

मजूर, हमाल आणि बाजार समितीचेही नुकसान 
शेतीवर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांचेच नुकसान या पावसामुळे झाले नाही, तर मजूर, बाजार समितीतील हमाल, अवजड वाहने आणि बाजार समितीलाही फटका बसला आहे. माल चांगला झाल्यास बाजार समितीला मोठा फायदा होत असतो. 

वर्षे  मका आवक क्विंटल इतर धान्य बाजार शुल्क
2014 152181 230487 62 लाख 59 हजार 160 र
2015 102463 195663 43 लाख 24 हजार 593 
2016 112591 206523 45 लाख 24 हजार 119
2017 121213 259507 51 लाख 82 हजार 049
2018 60825 180000 62 लाख 13 हजार 623 रुपये
2019 1157 1702 00000

मका एक महिना विक्रीसाठी येईल. दरवर्षी तीन ते चार महिने मका विक्री होते. यंदा चित्र मात्र वेगळे राहणार आहे. एकच महिन्यात मका विक्री होईल. सध्या बाजार समितीत दोन हजार क्विंटलची आवक आहे. 900 ते 1100 रुपयांचा दर मिळत आहे. जो माल विक्रीला येतोय तो कोंब आलेले, ओलसर माल येत आहेत. 30 ते 35 टक्‍के आर्द्रता असलेल मका बाजारात विक्रीसाठी येत आहे. महिनाभरानंतर मकाची आवक कमी होईल. यंदा हा दर दीड हजारपर्यंत जाईल. 
- कन्हैयालाल जैस्वाल, मर्चंट असोसिएशन, अध्यक्ष 

बाजरी निघण्याच्या वेळेला पाऊस झाल्यामुळे ओला मालच विक्रीसाठी येत आहे. बाजरीची आवक चांगली आहे; पण भाव नाही. एरवी 1800 रुपये दर मिळणाऱ्या बाजरीला सध्या दीड हजार रुपयांचा दर मिळत आहे. यंदा मूग निघालाच नाही. कपाशीचे पातेही गळाले, यामुळे ज्या कैऱ्या कपाशीला आल्या होत्या त्याचे नुकसान झाले. तुरीला मात्र फायदा होईल; मात्र धुके आल्यास त्यांचेही नुकसान होण्याची शक्‍यता आहे. पावसामुळे 50 टक्‍के परिणाम होणार आहे. 
- दिलीप गांधी, सचिव, मर्चंट असोसिएशन 

चार वर्षांपासून दुष्काळामुळे बाजार समितीत येणाऱ्या शेतमालात घट होत आहे. यंदा लष्करी अळीमुळे मक्‍याचे नुकसान झाले. त्यासह अवकाळी पावसामुळे 80 टक्‍के नुकसान झाले आहे. यामुळे दरवर्षी मकासह इतर धान्यांतून बाजार समितीजला कोट्यवधी रुपयांचे शुल्क मिळते. यंदा ती मिळणार नाही. शेतकऱ्यांना शासनाकडून मदत मिळणे गरजेचे आहे. 
- राधाकिसन पठाडे, सभापती 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com