२४ गावांमध्ये परतले ८१७ जण, तत्काळ केले होम क्‍वॉरंटाइन, कुठे ते वाचा...  

bhet
bhet

पोतरा ः ‘कोरोना’चा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन सुरू असल्याने कामानिमित्त मेट्रोसीटीत गेलेले गावकरी गावात परत पोहचले असून येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातर्फे आतापर्यंत ८१७ जणांची आरोग्य तपासणी करून त्‍यांना १४ दिवस होम क्‍वॉरंटाईन राहण्यास सांगण्यात आले आहे.

‘कोरोना’ विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी आरोग्य विभागातर्फे गाव पातळीवर उपाययोजना राबविल्या जात आहेत. त्‍यासाठी केंद्रातील सर्व कर्मचारी कामाला लागले आहेत. ‘कोरोना’ आजारचा प्रादुर्भाव वाढू नये म्‍हणून (ता.१४) एप्रिलपर्यत संचारबंदी व जमावबंदीचे आदेश लागू आहेत. तसेच एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जाण्यास देखील मनाई करण्यात आली आहे. जिल्‍ह्याच्या सीमा बंद केल्या आहेत. 

२४ गावातील ८१७ गावकरी

मागच्या काही दिवसांपुर्वी पोतरा प्राथमिक आरोग्य केंद्रातंर्गत येणाऱ्या २४ गावातील ८१७ गावकरी मेट्रोसीटीत कामासाठी गेले होते. यात पुणे, औरंगाबाद, मुंबई, सांगली आदी शहरांचा सामवेश आहे. ते गावकरी आता गावात परत आले आहेत.

कोणीही संशयित आढळला नाही
वैद्यकीय अधिकारी डॉ. मदन गारोळे, डॉ. ज्ञानेश्वर दांडेगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य कर्मचाऱ्यांनी या सर्वांच्या घरी जावून त्‍यांच्या भेटी घेतल्या. त्‍यांची आरोग्य तपासणी देखील केली आहे. यात कोणीही संशयित आढळला नाही परंतु, खबरदारी म्‍हणून या सर्वाना होम क्‍वॉरंटाईन होण्यास सांगितले आहे. दरम्‍यान, आरोग्य केंद्रातंर्गत येणाऱ्या २४ गावात आरोग्य केंद्राचे कर्मचारी, अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशावर्कर हे घरोघरी जावून सर्वेक्षण करीत आहेत. गावात सॅनिटायझर व मास्‍कचे देखील वाटप करण्यात आले आहे.

सर्व रस्‍ते काट्या टाकून बंद
आता पोतरा गावासह परिसरातील अनेक गावात बाहेरगावातून येणाऱ्यांसाठी सर्व रस्‍ते काट्या टाकून बंद करण्यात आले आहेत. गावातील कोणी बाहेर जाणार नाही व बाहेर गावातील कोणी गावात येणार नाही, अशी व्यवस्‍था करण्यात आली आहे. आरोग्य केंद्राच्या कर्मचाऱ्यासह अंगणवाडी सेविका, आशा वर्कर यासाठी पुढाकार घेत आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com