राज्यात शालेय मुलांची 83 टक्के 'आधार' नोंदणी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 9 डिसेंबर 2016

औरंगाबाद - शालेय विद्यार्थ्यांना आधार कार्ड देण्यासाठी अभियान राबविले जात असून नोंदणी शंभर टक्के करण्यासाठी ता. 13 जून 2016 रोजी सूचना देण्यात आल्या आहेत. आता पाच ते अठरा वयोगटांतील शालेय विद्यार्थ्यांचे आधार कार्ड नोंदणी करण्यासाठी वर्षातून दोनदा शिबिरे आयोजित केली जाणार आहेत.

आजपर्यंत 5 ते 18 वयोगटांतील मुलांचे आधार कार्ड नोंदणीचे काम 83 टक्के झाले आहे. हे प्रमाण शंभर टक्के पूर्ण करण्यासाठी तसेच पाचव्या वर्षी व पंधराव्या वर्षी मुलांचे आधार कार्ड नोंदणी करणे, अद्ययावत करणे आवश्‍यक असल्याने शिक्षणाधिकारी (प्राथमिक, माध्यमिक) यांनी जिल्ह्यातील शाळांचे वेळापत्रक जाहीर करून वर्षातून दोनदा आधार नोंदणी शिबिर घेणे अनिवार्य करण्यात आले आहे.

Web Title: 83 percent of school children aadhar card registration