GOOD NEWS : कळंब तालूक्यातील ८७० शेतकऱ्यांना मिळणार सौर कृषीपंप 

-saur.jpg
-saur.jpg

कळंब  (उस्मानाबाद) : गेल्या काही वर्षांपासून शेतकऱयांना शेती पिकविण्यासाठी विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे. काही शेतकऱ्यांच्या विहिरीमध्ये पाणी असून सुद्धा विजेच्या भारनियमन आणि विजेच्या लपंडावामूळे दिवसा पिकांना पाणी देत येत नाही. त्यामुळे केंद्र व राज्य शासनाने शेती व्यवसायासाठी महत्वपूर्ण गरज असलेली वीज शेतकऱ्याना अखंडपणे उपलब्ध व्हावी. यासाठी सुरू केलेली मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना शेतकऱ्यासाठी फायदेशीर ठरत असून कळंब तालुक्यातील ८७० शेतकऱयांनी ऑनलाईन अर्ज केले आहेत. यापैकी ७८७ सौर कृषीपंप मंजूर झाले असून ८४ अर्ज तांत्रिक बाबीमुळे रिजेकट झाले आहेत. रिजेकट अर्ज ऑक्टिव्ह करण्यासाठी वीज कंपनीचे अधिकारी धावाधाव करीत असल्याची माहिती समोर आली आहे.

कळंब तालुक्यात दुष्काळ हा शेतकऱ्याच्या पाचवीला पुजला असल्याची स्थिती आहे. त्यामळे अर्थकारण कोलमडलत चालले आहे. तालूक्यातील शेती हा मुख्य व्यवसाय असून कायमस्वरूपी सिंचन व्यवस्था नसल्याने शेतकऱयांना विविध समस्येने तोंड द्यावे लागत आहे. त्यातच पाणी असूनही विजेच्या समस्येमुळे शेतीला पाणी देणे कठीण बनत आहे. 

तत्कालीन फडणवीस सरकारने शेती व्यवसायासाठी महत्वपूर्ण असलेली वीज शेतकऱयांना अखंडीतपणे मिळण्यासाठी केंद्र सरकारची अटल तर राज्य सरकारने मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना सुरू करण्यात आली आहे.योजनेला शेतकऱ्याचा प्रतिसाद मिळत असून ही योजना शेतकऱ्यासाठी अत्यंत लाभदायी आहे.२०१९ मध्ये तालुक्यातील ८७० शेतकऱयांनी सौरकृषी पंप मिळण्यासाठी विजकंप नीच्या पोर्टलवर अनलाईन अर्ज करण्यात आले होते. यापैकी ७८७ अर्ज मंजूर झाले असून तांत्रिक त्रुटीमुळे ८४ अर्ज रिजेक्ट झाले आहेत.रिजेक्ट झालेले अर्ज शेतकऱयांशी संवाद साधून सलेक्त करण्यासाठी वीज कंपनीचे अधिकारी स्वतःहून प्रयत्न करताना पहावयास मिळतं आहे.गेल्यावर्षी ही तालुक्यात अटक व मुख्यमंत्री सौरकृषी योजनेतून कृषी पंप बसविण्यात आले आहेत.

तालुक्यात बसणार ८७० सौरकृषी पंप

तालुक्यातील शेतकऱयांना रब्बी हंगामातील पिकांना पाणी देण्यासाठी सर्वात जास्त त्रास भारनियमन आणि विजेच्या लपंडावमुळे सहन करावा लागत होता.यंदा नव्याने ८७० कृषी पंप बसविण्यात येणार असल्याने शेतीला पाणी देण्याच्या समस्येतून सुटका मिळणार आहे.

रिजेक्ट अर्ज सिलेक्ट करणार 

तांत्रिक अडचणीमुळे काही शेतकऱ्याचे अर्ज रिजेक्ट झाले आहेत.शासनाच्या व वीज कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशाने रिजेक्ट अर्ज सलेकट करण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू असल्याचे वीज कंपनीचे सौर कृषीपंप विभागाचे उमेश जानराव यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com