शहरात 89 मतदान केंद्रे संवेदनशील 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 19 एप्रिल 2017

लातूर - महापालिकेच्या निवडणुकीत 371 मतदान केंद्रे असून या पैकी 89 केंद्रे संवेदनशील आहेत. या केंद्रासह शहरात मतदानाच्या काळात अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिस अधीक्षक डॉ. शिवाजी राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. 

लातूर - महापालिकेच्या निवडणुकीत 371 मतदान केंद्रे असून या पैकी 89 केंद्रे संवेदनशील आहेत. या केंद्रासह शहरात मतदानाच्या काळात अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिस अधीक्षक डॉ. शिवाजी राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. 

मतदान प्रक्रिया शांततेने व निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी जिल्हा पोलिस दलाच्या वतीने एक पोलिस अधीक्षक, एक अप्पर पोलिस अधीक्षक, चार उपविभागीय अधिकारी, आठ पोलिस निरीक्षक, 38 सहायक पोलिस निरीक्षक, एक हजार पोलिस कर्मचारी, चार आरसीपी प्लाटून, 750 होमगार्ड, नांदेड परिक्षेत्रातून आलेले आठ पोलिस अधिकारी, 40 पोलिस कर्मचारी व राज्य राखीव पोलिस दलाच्या दोन कंपन्या तैनात करण्यात आल्या आहेत. 

शहरात 371 पैकी 89 संवेदनशील मतदान केंद्रे आहेत. या ठिकाणी अतिरिक्त पोलिस बंदोबस्त नियुक्त करण्यात आला आहे. मतदान प्रक्रियादरम्यान बंदोबस्तासाठी शहरात 23 सेक्‍टर जीप पेट्रोलिंग, 40 मोटार सायकल पेट्रोलिंग, 29 फिक्‍स पॉईंट, पाच नाकाबंदी पॉईंट, चार एसएसटी पथक, सहा फ्लाईंग स्कॉड, सहा व्हीएसटी पथक नियुक्त करण्यात आले आहेत. पोलिस अधीक्षक डॉ. राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातून वाहनातून संचलन करण्यात आले. हे संचलन एक नंबर चौक, पाण्याची टाकी, खाडगाव रोड, जुना औसा रोड, राजीव गांधी चौक, नाईक चौक, ठाकरे चौक, कन्हेरी टी पॉईंट, बसवेश्‍वर चौक, गोजमगुंडे पेट्रोल पंप, सम्राट चौक, शाहू चौक, आंबेडकर चौक, शाहू चौक, बरकतनगर, हत्तेनगर, गांधी चौक, गूळमार्केट, शिवाजी चौक, रेणापूर नाका आदी मार्गांवर नेण्यात आले. मतदानाच्या दरम्यान गैरप्रकार घडल्यास तातडीने पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन डॉ. राठोड यांनी केले आहे. 

Web Title: 89 polling stations sensitive