जालन्यात पकडले नऊ सट्टेबाज

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 एप्रिल 2018

जालना - 'आयपीएल" स्पर्धेतील सामन्यावर सट्टा लावणाऱ्या चार संशयितांना पोलिसांनी रविवारी (ता. 22) रात्री उशिरा अटक केली.

त्यांच्याकडून रोख रकमेसह एक लाख 74 हजारांचा मुद्देमाल जप्त केला. मुंबई इंडियन्स व राजस्थान रॉयल यांच्यातील सामन्यावर येथे सट्टा लावला जात होता. यातील तीन बुकी फरारी आहेत; तर मंठ्यातूनही पाच जणांना ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी दि ग्रेट मंमादेवी हॉटेलात छापा घालून अमित रठ्ठैया, विनोद रठ्ठैया, शेख नजीर शेख इब्राहीम आणि रूपेश घोडके यांना ताब्यात घेतले. तीन जण फरारी आहेत. या सट्ट्याचे मुख्य सूत्रधार गोव्यात असल्याचे प्राथमिक तपासातून पुढे आले.

Web Title: 9 Speculator arrested IPL competition crime