राज्यातील ९० लाख शिधापत्रिका रद्द

Ration Card
Ration Card

हिंगोली - राज्यात बोगस शिधापत्रिका शोधमोहिमेत बनावट आढळून आलेल्या तब्बल ९० लाख शिधापत्रिका रद्द केल्याची माहिती राज्य ग्राहक कल्याण संरक्षण समितीचे अध्यक्ष अरुण देशपांडे यांनी सोमवारी (ता. एक) पत्रकार परिषदेत दिली.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत श्री. देशपांडे यांच्यासह जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी, अतिरिक्त जिल्हाधिकारी जगदीश मणियार उपस्थित होते. 

श्री. देशपांडे म्हणाले, की ग्राहकाचा पहिला अधिकार अन्नसुरक्षा आहे. ग्राहक तक्रार निवारणासाठी राज्यस्तरीय १८००२२२३६५ हा टोल फ्री क्रमांक उपलब्ध करून देण्यात आला आहे. ७२ तासांच्या आत या तक्रारीचे निवारण करून त्या सोडविण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत. आवेष्ठीत असलेल्या वस्तूंबाबत देखील तक्रार करता येणार आहे. अतिरिक्त जिल्हाधिकारी अथवा उपजिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली जिल्हास्तरावर ग्राहक प्राधिकरण स्थापन केले जाणार असून पाणीपुरवठ्यासंबंधी देखील तक्रार करता येणार आहे.

सेलिब्रिटींविरुद्धही दाद मागता येणार
सेलिब्रिटींनी केलेल्या जाहिरातीमुळे फसवणूक झाल्यास ग्राहकाला सेलिब्रिटींविरुद्ध दाद मागता येणार आहे. या कायद्यानुसार सेलिब्रिटींना १० ते ५० लाख रुपयांपर्यंत दंडाची तरतूद होणार असून केंद्रीय मंत्रिमंडळाने कायद्याच्या मसुद्याला मान्यता दिली आहे. लोकसभा व राज्यसभेत हे विधेयक पारित होऊन हा कायदा अस्तित्वात येईल, असेही त्यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com