भगवानगड पाणीयोजनेसाठी 92 कोटींचा आराखडा मंजूर 

राजेंद्र सावंत 
सोमवार, 20 ऑगस्ट 2018

पाथर्डी: भगवानगड व 35 गावांच्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजना व शेवगाव-पाथर्डीतील सात गावांच्या राष्ट्रीय पेयजल योजनेसाठी 98 कोटी रुपयांच्या आराखड्यास राज्य सरकारने मंजूरी दिली, अशी माहिती आमदार मोनिका राजळे यांनी दिली.

भगवानगड व परिसरातील 35 गावांच्या पाणीयोजनेसाठी सरकारने 92 कोटी रुपये मंजूर केले आहेत. त्यात भगवानगड, येळी, खरवंडी, पिंपळगव्हाण, भुतेटाकळी, भालगाव, एकनाथवाडी, मुंगुसवाडे, मालेवाडी, ढाकणवाडी, मिडसांगवी, भारजवाडी, टाकळी मानूर, अकोला, मोहोज देवढे, जवळवाडी, मोहटा, करोडी, चिंचपूर इजदे, पिंपळगाव टप्पा, तीनखडी, जांभळी, दैत्यनांदूर, सोनोशी, जिरेवाडी, कोळसांगवी, अंबिकानगर, तोंडोळी, निपाणी जळगाव, कळसपिंप्री, औरंगपूर, जुंभळी व शेवगाव तालुक्‍यातील नागलवाडी, गोळेगाव, कोनोशी या गावांचा समावेश आहे. या गावांतील वाड्या-वस्त्यांचाही योजनेत समावेश आहे. 

राष्ट्रीय पेयजल योजनेतून कासार पिंपळगाव, सैदापूर, लांडकवाडी, सुसरे तसेच शेवगाव तालुक्‍यातील वडुले, वाघोली व निंबेनांदूर येथील योजनांसाठी सहा कोटींस सरकारने मंजुरी दिली. 

Web Title: 92 crores approved for Bhagwangad water planning