परभणीत 99.60 टक्के मतदान

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 21 मे 2018

परभणी : परभणी-हिंगोली स्थानिक प्राधिकारी मतदारसंघासाठी सोमवारी (ता.21) सात केंद्रावर 99.60 टक्के मतदान झाले. परभणीतील केंद्रावर सायंकाळी पाऊणे पाच वाजेपर्यंत मतदान करण्यात आले असून हिंगोली केंद्रावर दोन मतदार गैरहजर राहिले. 

परभणीतील केंद्रावर दुपारी चार वाजता मतदार आल्याने पाऊण तास उशीरापर्यंत मतदान सुरू होते. तरीही 133 पैकी सर्वांनी हक्क बजावला. उर्वरित सेलू 54, पाथरी 65 आणि गंगाखेड केंद्रावर 70 मतदारांनी हक्क बजावल्याने 100 टक्के मतदान झाले. दुसरीकडे हिंगोलीतील वसमत आणि कळमनुरी केंद्रावर अनुक्रमे 51 आणि 19 मतदारांनी हक्क बजावल्याने शतप्रतिशत मतदान झाले.

परंतु हिंगोली केंद्रावर दोन मतदार गैरहजर राहिल्याने 98.17 टक्के मतदानाची नोंद करण्यात आली. येथे 109 पैकी 107 जणांनी मतदान केले. तत्पूर्वी पहिल्या टप्प्यात 1.72, दुपारी बारा वाजेपर्यंत 14.17, दोन वाजेपर्यंत 36.73 आणि दुपारी चार वाजेपर्यंत परभणी वगळता सर्व ठिकाणी 100 टक्के मतदान झाले होते. गुरूवारी (ता. 24) सकाळी 11 वाजता परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात मतमोजणी होणार आहे. सोमवारी काँग्रेसचे सुरेश देशमुख, शिवसेनेचे विप्लव बाजोरिया आणि अपक्ष सुरेश नागरे यांचे भविष्य मतपेटीत बंद झाले.

Web Title: 99.60 percent voting in parabhani