चारा छावणीला नव्हे, दावणीला द्या 

आम आदमी पक्षाचे आंदोलन
आम आदमी पक्षाचे आंदोलन

औरंगाबाद - दुष्काळ जाहीर करून दोन महिन्यांचा कालावधी लोटला; मात्र अद्यापही उपाययोजना सुरू करण्यात आलेल्या नाहीत. जनावरांसाठी चारा हा छावणीला नव्हे; तर दावणीला द्या, अन्यथा रस्त्यावर उतरू, असा इशारा आम आदमी पार्टीने (आप) दिला. 

दुष्काळग्रस्तांच्या प्रश्‍नांवर आपने विभागीय आयुक्‍तालयासमोर मंगळवारी (ता. 29) धरणे आंदोलन केले. याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले, माणसांसाठी पाणी पुरविताना जनावरांचीही दखल घ्यावी, रोहयोची कामे ही शेतीपूरक असावीत, 2018 चे पीककर्ज माफ करा, शेतकऱ्यांना 50 हजार 600 रुपये नुकसान भरपाई द्या, आदिवासींच्या वनहक्क जमिनी 7/12 वर नोंदी घ्यावात आदी मागण्यांचा निवेदनात समावेश आहे. या आंदोलनात पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष रंगा राचुरे, किशोर मादयांन, अजिंक्‍य शिंदे, सुग्रीव मुंडे, सुरेश पवार, अनिल ढवळे, अशोक येडे, बोराडे अण्णा, ऍड. अजित खोत, परमेश्वर यादव, विठ्ठलराव शिंदे, व्यंकटराव जाधव, गोपाळराव ढोणे, प्रतापराव भोसले यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी होते. 
  
जॉर्ज फर्नांडिस यांना श्रद्धांजली 
ज्येष्ठ समाजवादी नेते जॉर्ज फर्नांडिस यांचे निधन झाले. त्यांच्यासोबत काम केलेल्या व सध्या आम आदमी पार्टीमध्ये प्रदेश उपाध्यक्ष असलेल्या रंगा राचुरे यांनी येथे आठवणी सांगितल्या. तसेच पार्टीतर्फे आंदोलन सुरू असताना त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com