केजरीवाल यांचे मराठमोळ्या पद्धतीने स्वागत

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 12 जानेवारी 2018

औरंगाबाद - आपचे संयोजक, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे औरंगाबाद विमानतळावर मराठमोळ्या पद्धतीने जल्लोषात स्वागत करण्यात आले. 

आम आदमी पार्टीने महाराष्ट्रात कम बॅक केले आहे. अरविंद केजरीवाल हे शुक्रवारी (ता. बारा) सिंदखेडराजा येथे राष्ट्रमाता जिजाऊ जयंतीनिमित्त जिजाऊंना अभिवादन करून सभा घेणार आहेत. या सभेनंतरच त्यांच्या महाराष्ट्रातील नवीन राजकीय पर्वाला सुरवात होणार आहे. त्यासाठी गुरुवारी (ता. ११) सायंकाळी आठ वाजता त्यांचे विमानतळावर आगमन झाले. रात्री मुक्काम करून शुक्रवारी सकाळी ते सिंदखेडराजा येथे रवाना होत आहेत.

अरविंद केजरीवाल पहिल्यांदाच औरंगाबादेत येत असल्याने कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह होता. विमानतळावर त्यांच्या स्वागतासाठी दोन तासांपासून आपचे शकडो कार्यकर्ते थांबलेले होते. आठ वाजता विमानतळावर आगमन झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला, विमानतळावर उतरताच तुतारी वाजवून त्यांचे स्वागत करण्यात आले, त्यानंतर महिलांनी औक्षण केले. कार्यकर्त्यांना त्यांनी हात उंचावून प्रतिसाद दिला. या वेळी आपच्या राष्ट्रीय प्रवक्‍त्या प्रीती शर्मा मेनन यांच्यासह कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. 

प्रसारमाध्यमांना टाळले 
अरविंद केजरीवाल यांचे आगमन होताच प्रसार माध्यमांनी त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला; मात्र प्रसारमाध्यमांना टाळून त्यांनी मोटारीने सुभेदारी विश्रामगृहाकडे प्रयाण केले. कार्यकर्त्यांना केजरीवाल हस्तांदोलन करतील असे सांगण्यात आले होते, प्रत्यक्षात कार्यकर्त्यांशीही त्यांनी हस्तांदोलन केले नाही.

Web Title: aaurangabad news arvind kejariwal in aurangabad