औरंगाबादला डी.एड.च्या तब्बल 50 टक्के जागा रिक्त 

संग्रहीत छायाचित्र
संग्रहीत छायाचित्र

औरंगाबाद-  बारावीनंतर डी.एड. अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. यंदा जिल्ह्यात प्रवेश क्षमतेएवढेही अर्ज शिक्षण विभागाकडे प्राप्त झाले नाहीत. परिणामी जिल्ह्यातील डी.एड. अभ्यासक्रमाच्या 50 टक्के जागा रिक्त राहिल्या आहेत. त्यासाठी डी.एड.च्या तीन फेऱ्या संपल्यानंतर तीन ऑगस्टपर्यंत विशेष फेरी घेण्यात आली होती. मात्र, राज्यातील नैसर्गिक आपत्ती विचारात घेता या प्रक्रियेला 20 तारखेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. 


महाराष्ट्र राज्य शैक्षणिक, संशोधन व प्रशिक्षण परिषदेतर्फे डी.एड. अभ्यासक्रमासाठी 30 जूनपासून ऑनलाइन प्रवेशप्रक्रिया राबविण्यात आली होती. 24 जुलैपर्यंत प्रवेशाच्या तीन फेऱ्या पूर्ण झाल्यानंतर 29 जुलै ते 3 ऑगस्टदरम्यान विशेष फेरी घेण्यात आली होती. जिल्ह्यात एकूण 23 डी.एड.ची महाविद्यालये आहेत. त्यामध्ये तीन शासकीय; तर 20 विनाअनुदानित व एक उर्दू माध्यम (अल्पसंख्याक) विद्यालय आहे. जिल्ह्यात डी.एड. अभ्यासक्रमाच्या एकूण दोन हजार 457 जागा होत्या. यापैकी केवळ 627 विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज केले आहेत. त्यातून फक्त 462 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले. त्यानंत तीन ऑगस्टपर्यंत विशेष फेरी घेण्यात आली. यामध्ये दीडशे विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत. मात्र, राज्यातील नैसर्गिक आपत्ती लक्षात घेता या प्रक्रियेस 14 ते 20 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. यामध्ये ज्यांनी अर्ज केले होते; परंतु अपूर्ण अथवा दुरुस्तीमध्ये होते, त्यांनाही प्रवेश अर्ज भरता येणार आहेत; तसेच नव्याने प्रवेश घेणारे विद्यार्थीही अर्ज करू शकणार आहेत. 

जिल्ह्याची आकडेवारी 
जिल्ह्यातील एकूण 2 हजार 457 जागांपैकी एक हजार 360 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहे. शासनाकडून राबविल्या जाणाऱ्या ऑनलाइन प्रवेशप्रक्रियेतून प्रवेश घेण्याऐवजी काही विद्यार्थी व्यवस्थापन कोट्यातील प्रवेशास पसंती देत आहेत. जिल्ह्यातील 1,470 पैकी 747 विद्यार्थ्यांनी व्यवस्थापन कोट्यातून प्रवेश घेतले आहेत. तर शासकीय कोट्यातील 987 जागांपैकी 613 जागा भरल्या आहेत. 
 

उपलब्ध जागा

विषय शासकीय कोटा व्यवस्थापन कोटा एकूण 
मराठी 837 790 1627 
उर्दू 30 600 630
इंग्रजी 120 80 200

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com