मतदान प्रशिक्षणास गैरहजेरी भाेवली

मतदान प्रशिक्षणास गैरहजेरी भाेवली

बीड - विधानसभा निवडणुकीच्या प्रशिक्षणास गैरहजर राहिल्याप्रकरणी लिपिकाविरुद्ध गुन्हा नोंद करण्याचे आदेश देण्यात आले. अनिकेत किशोर झरकर असे या लिपिकाचे नाव आहे. 

बीड विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी नामदेव टिळेकर यांनी दिले आहेत. यासाठी बीडचे नायब तहसीलदार बी. आर. नागरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने बीड विधानसभा मतदारसंघातील मतदान अधिकारी व कर्मचाऱ्यांचे 12 व 13 ऑक्‍टोबरला यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात प्रशिक्षण आयोजित केले होते. यासाठी अनिकेत झरकर यांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, ते प्रशिक्षणासाठी गैरहजर राहिले.

गैरहजर राहिलेल्यांसाठी बुधवारी (ता. 16) प्रशिक्षण आयोजित केले होते. या प्रशिक्षणास हजर राहण्याबाबत संबंधितांस नोटिशीद्वारे कळविण्यात आले होते. तरीही अनिकेत झरकर प्रशिक्षणास गैरहजर राहिले. यामुळे निवडणूक कामकाजामध्ये अडथळा निर्माण झाल्याप्रकरणी अनिकेत किशोर झरकर, लिपिक यांच्याविरुद्ध लोकप्रतिनिधित्व अधिनियम अन्वये फौजदारी कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.  

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com