उमरग्यात कर्मचाऱ्यांना शिवीगाळ, पंचायत समितीच्या सभापतींवर कारवाईची मागणी

पंचायत समितीच्या सभापतीवर कारवाई करण्याची कर्मचारी संघटनेची मागणी, कर्मचाऱ्यांनी दिल्या मुर्दाबादच्या घोषणा !
Umarga Panchayat Samiti, Osmanabad
Umarga Panchayat Samiti, Osmanabad esakal

उमरगा (जि.उस्मानाबाद) : पंचायत समितीतील एका ज्येष्ठ कर्मचाऱ्याला सभापती सचिन पाटील यांनी असंवैधानिक भाषा वापरून अश्लील शिवीगाळ केल्याने जिल्हा परिषद, पंचायत समिती कर्मचारी संघटनेने सोमवारी (ता.१४) काळ्या फिती लावून काम केले. सभापतीवर प्रतिबंधात्मक ठोस कारवाई करावी अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा गटविकास अधिकारी यांना दिलेल्या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. निवेदनात म्हटले आहे कि, वरिष्ठ सहायक एच. व्ही. कोळी यांना ११ फेब्रुवारीला उमरगा (Umarga) पंचायत समितीचे सभापती पाटील यांनी अश्लील शिवीगाळ शिवीगाळ केली. या संदर्भात कोळी यांनी कर्मचारी संघटनेकडे अर्जाद्वारे व्यथा मांडली होती. या  अगोदरही पाटील यांनी चार वेळा कर्मचारी, अधिकारी यांना त्यांच्या दालनामध्ये बोलावून शिवीगाळ केलेल्या घटना घडलेल्या आहेत. (Abusive Words Use Against Umarga Panchayat Samiti Staff Osmanabad Latest News)

Umarga Panchayat Samiti, Osmanabad
Latur : लातूर-नांदेड महामार्गावर अपघात, चापोलीच्या तरुण व्यापाऱ्याचा मृत्यू

याबाबत संघटनेकडुन वेळोवेळी लेखी स्वरुपात कळविण्यात आलेले आहे. संबंधित व्यक्तीच्या कृत्याबाबत प्रशासनास कळवूनही प्रशासनाकडून संघटनेच्या भावनेचा कसल्याही प्रकारचा विचार करण्यात आलेला नाही किंवा कसल्याही प्रकारची प्रतिबंधात्मक कार्यवाही करण्यासाठी ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यामुळे संघटना व्यथित होऊन नाईलाजाने सर्व संघटनेतील कर्मचारी, अधिकारी यांची सुरक्षिततेच्या व आत्मसम्मानाच्या दृष्टिने विचार करून सोमवारी तालुका संघटनेच्या वतीने काळ्या फिती लावुन कामकाज करीत असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

ठोस कार्यवाही होईपर्यंत तालुका संघटना पर्यायाने जिल्हा संघटनेकडून कामकाज बंद अथवा असहकार्य आंदोलन करण्यात येणार आहे. संघटनेच्या मागण्यांचा व हिताचा विचार करून सभापती पाटील यांच्या विरुद्ध प्रतिबंधात्मक कार्यवाही करावी असे निवेदनात म्हटले आहे. पंचायत समिती (Panchayat Samiti) कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष एम.एस. बिडवे, उपाध्यक्ष ए.डी. चिंचोळे, सचिव बी.एम. पवार यांच्या निवेदनावर सह्या आहेत.

Umarga Panchayat Samiti, Osmanabad
शिवजयंती 19 फेब्रुवारीलाच साजरी करा; शिवसेना आमदारांची मागणी

सभापती - कर्मचाऱ्यांत नेहमी होतोय वाद !

सभापती पाटील यांच्याकडून कर्मचाऱ्यांना नेहमी अपमानास्पद वागणूक दिली जात असल्याची कर्मचारी संघटनेचे म्हणणे आहे. काही कर्मचारी ज्येष्ठ आहेत. ते पदाधिकाऱ्यांचा मान राखतात मात्र कसलेही बोलणे सहन करावे लागत असल्याने कर्मचारी व्यथित झाले आहेत. यापूर्वी त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्याकडे कैफियत मांडली होती. मात्र वरिष्ठ अधिकारी व काही पुढाऱ्यांच्या मध्यस्थीने वादावर पडदा टाकला जातो. पदाधिकारी व कर्मचाऱ्यानी समन्वयातुन काम करायले हवे मात्र अनेक वेळा वाद होत असल्याने आता लोकप्रतिनिधींच्या 'गॉडफादर' ने यात लक्ष घालायला हवे. (Osmanabad Update)

कर्मचाऱ्यांची काम करण्याची प्रवृत्ती नाही. कामाचा जाब विचारल्यावर संघटनेचा आधार घेऊन खोटे आरोप केला जात आहेत.

- सचिन पाटील, सभापती

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com