महा ई-सेवा केंद्र चालकासह दोघेजण एसीबीच्या जाळ्यात 

ACB officials caught the Maha e service center director at nanded
ACB officials caught the Maha e service center director at nanded

नांदेड : उत्पन्नाचे प्रमाणपत्र देण्यासाठी दोनशे रुपयाची लाच स्वीकारणाऱ्या महा ई-सेवा केंद्र चालकासह दोघेजण एसीबीच्या जाळ्यात अडकले. ही कारवाई मुक्रमाबाद येथे सोमवारी (ता. 20) करण्यात आली. 

मुक्रमाबाद परिसरात राहणारा एक तक्रारदार यांच्या वडिलांच्या नावे उत्पनाचे प्रमाणपत्र काढण्यासाठी त्याने महा ई-सेवा केंद्रात फाईल दाखल केली. परंतु ते प्रमाणपत्र देण्यासाठी सेवा केंद्रचालक खुशाल सोपाणराव जाधव आणि त्याचा एक सहकारी अमोल राजेंद्र दापकेकर यांनी संगनमत करून प्रमाणपत्रासाठी तक्रारदार यांच्याकडे चारशे रुपयाची मागणी केली. परंतु ही लाच देण्याची ईच्छा नसल्यामुळे तक्रारदार याने नांदेड येथे येऊन संबंधिताविरूध्द तक्रार दिली. या तक्रारीच्या आधारे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपाधिक्षक विजय डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक बळवंत पेडगावकर यांनी रविवारी (ता. 19) मुक्रमाबाद येथे पडताळणी सापळा लावला. यात दोनशे रुपये देण्याचे ठरले. त्यावरुन सोमवारी (ता. 20) एसीबीच्या पथकांनी हरीओम झेरॉक्स व शासकीय महा ई-सेवा केंद्र परिसरात लावलेल्या सापळ्यात दोनशे रुपये घेतांना खुशाल जाधव आणि अमोल दापकेकर यांना रंगेहात पकडण्यात आले.

त्यांच्याविरूध्द बळवंत पेडगावकर यांच्या फिर्यादीवरुन मुक्रमाबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा सापळा यशस्वी करण्यासाठी पोलिस नाईक एकनाथ गंगातिर्थ, अंकुश गाडेकर, सुरेश पांचाळ आणि शिवहारी किडे यांनी परिश्रम घेतले. 

एसीबीचे पालकांना आवाहन -
जिल्ह्यातील पालक आणि विद्यार्थ्यांना आवाहन करण्यात येते की, ई- सुविधा केंद्राद्वारे शासकीय काम करण्यासाठी 30 ते 40 रुपये शासकीय फी आकारली जाते. परंतु ई-सेवा केंद्र चालकांकडून जास्तीचे पैसे उकळण्यात येत आहेत. असे जास्तीचे पैसे शासकीय अधिकारी, कर्मचारी हे शासकीय काम करण्यासाठी लाचेची मागणी कोणी करत असले तर, संबंधितांविरूध्द आमच्याकडे थेट तक्रार करावी किंवा 1064 या टोल फ्री क्रमांकावर तसेच 02462-253512 या फोनवर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com