कोरोना काळातही प्रशासकीय कामकाजाला दिली गती

सीईओ वर्षा ठाकूर ; गावपातळीवर केले कोरोनाचे सुरक्षा कवच
nanded
nanded sakal

नांदेड : कोरोना काळामध्येच मी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदाचा पदभार स्वीकारला. या कठीण काळामध्येही प्रशासकीय कामकाज कधीही थांबू दिले नाही. मला कोवीड झाल्यावरही घरून काम केले. विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी केली. अर्थात अधिकारी, कर्मचाऱ्यांचे सहकार्य मिळाल्यानेच मी एक वर्ष यशस्वी काम करु शकले, असे मत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर - घुगे यांनी ‘सकाळ’शी बोलताना व्यक्त केले.

सीईओ वर्षा ठाकूर या ता. २८ सप्टेंबर २०२० रोजी नांदेड जिल्हा परिषदेत रुजू झाल्या. आपल्या कल्पक व लोकाभिमुख प्रशासनात त्यांनी एक वर्षाच्या कालावधीत आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली. सर्वसमावेशक वृत्तीचा प्रशासक असेल तर सर्व योजना गतिमान होतात आणि विकासाचे मार्ग खुले होत जातात, हे वर्षा ठाकूर यांनी एका वर्षात दाखवून दिले. त्यानिमित्त त्यांच्याशी सोमवारी (ता.२७) संवाद साधला असता विविध योजनांची त्यांनी माहिती दिली.

प्रभावी ठरलेल्या योजना - उपक्रम

स्वच्छ माझे कार्यालय, महिलांच्या आरोग्यासाठी विविध उपक्रम, जिल्हा परिषदेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन ऑफलाइन शिक्षण, सुंदर माझे कार्यालय, सुंदर माझे गाव, लोकसहभागातून वृक्ष लागवड, दुर्गम भागांना भेटी, कोरोना काळातील व्यवस्थापन, स्मार्ट अंगणवाडी, मुलींची सन्मान योजना, महिला कर्मचाऱ्यांसाठी तक्रार पेटी, फिरते पशुवैद्यकीय पथक, मागेल त्याला काम, सर्वांसाठी घरे, गाव तिथे स्मशानभूमी, वृक्ष लागवड मोहिम, जनावरांचे लसीकरण, पंचायत राज समितीच्या दौऱ्याचे नेटके नियोजन आदी.

nanded
औरंगाबाद कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सर्वसाधारण सभेत घोषणाबाजी;पाहा व्हिडिओ

कोरोनाचे सुरक्षा कवच

कोरोना काळाला तोंड देणे ही अत्यंत जोखमीची जबाबदारी प्रशासक या नात्याने वर्षा ठाकूर यांच्यावर आली. ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ ही महत्त्वाकांक्षी मोहिम प्रभावीपणे राबवली. गावपातळीवर कोरोनाचे सुरक्षा कवच तयार केले. ग्रामीण भागातील महिलांचे आरोग्य बिघडल्यानंतर शहराकडे त्यांना पायपीट करावी लागू नये, गर्भधारणा झालेल्या मातांचे समुपदेशन आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातच बाळंतपण आणि बाळंतपणानंतरच्या सर्व वैद्यकीय सुविधा पुरवण्यासाठी प्रभावी नियोजन केले.

अंगणवाड्यांमध्ये सामुदायिक कार्यक्रम

जिल्ह्यात तीन हजार ७७६ अंगणवाड्यांमध्ये सामुदायिक कार्यक्रम, रॅपिड रिपोर्ट, तरंग कुपोषित महाराष्ट्राचा, बेटी का नाम घर की पहचान कार्यक्रम, बालविवाह प्रतिबंध अशा विविध उपाययोजना प्रभावी ठरल्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com