खेळणारा मुलगा आडवा आला आणि बस अशी उलटली, की...

सुभाष बिडे
रविवार, 12 जानेवारी 2020

अंबड ते घनसावंगी, पुढे कुंभारपिंपळगाव रस्त्याचे काम सुरू असून सर्वत्र रस्ता उखडून टाकण्यात आलेला आहे. या रस्त्यावर पाणी मारण्यात येत नाही. त्याचबरोबर वाहनासाठी व नियमित वाहतुकीसाठी साईड रस्ता काढण्यात आला नाही.

घनसावंगी (जि.जालना) : रस्त्यात सायकल खेळणारा मुलगा आडवा आला आणि त्याला वाचवण्याच्या नादात अख्खी बस उलटल्याची घटना रविवारी (ता. १२) दुपारी एक वाजता ताड हादगावजवळ घडली. 

राज्य परिवहन महामंडळाची श्रीपत धामणगाव ते अंबड ही बस घनसावंगीहून अंबडकडे जात होती. ताडहादगावजवळ रस्त्यावर सायकल खेळणारा मुलगा मध्ये आल्याने त्याला वाचविण्याच्या प्रयत्नात बस उलटली. या अपघातात तीन ते चार प्रवासी जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. 

Image may contain: one or more people, people standing, sky, tree, outdoor and nature

श्रीपत धामणगाव ते अंबड (बस क्रंमाक एम.एच.२० डी ९९८१) ही बस दुपारी एक वाजेच्या दरम्यान ताडहादगाव गावाजवळ आली असताना रस्त्यावर सायकल खेळणारा मुलगा आडवा आला, तर दुसऱ्या बाजूने जनावरे चरण्यासाठी चालली होती. बस चालक के.के. पठाण यांचे या दोघांना वाचविण्याच्या प्रयत्नात बसवरील नियंत्रण सुटले.

त्यामुळे बस रस्त्याच्या खाली घसरून उलटली. यात सुरेखा नवनाथ साबळे ( वय 25, रा. वडीरामसगाव), तर सखुबाई मनोहर वाघ (वय 45, रा. मोहपुरी) यांच्यासह सह इतर तीन जण किरकोळ जखमी झाले. जखमींना उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. 

Image may contain: outdoor

दरम्यान अंबड ते घनसावंगी, पुढे कुंभारपिंपळगाव रस्त्याचे काम सुरू असून सर्वत्र रस्ता उखडून टाकण्यात आलेला आहे. या रस्त्यावर पाणी मारण्यात येत नाही. त्याचबरोबर वाहनासाठी व नियमित वाहतुकीसाठी साईड रस्ता काढण्यात आला नाही. रस्त्यावर रेडियम लावण्यात आले नाही. दिशादर्शक फलकही नाही. त्यामुळे रस्त्यावर सतत धुळ असते. परिणामी वाहनधारकांना नेहमी धुळीचा त्रास सहन करावा लागतो

आणखी एक अपघात

पाडुळी खुर्द (ता.घनसावंगी) येथे शनिवारी (ता.११) रात्री आठ वाजेच्या दरम्यान ऊसतोड कामगारांच्या मोटरसायकलला टेम्पोने धडक दिल्याने दोन मोटरसायकलस्वार व टेम्पो चालक गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर जिल्हास्तरावरील सरकारी रुग्णालय व खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 

हेही वाचा -
प्रख्यात रंगकर्मी डॉ. शशिकांत बऱ्हाणपूरकर यांचे निधन 

" कलाग्राम 'वर अवतरली उद्योगनगरी   

या शिक्षिकेच्या सल्ल्याने केले अजय देवगणने केले "तान्हाजी'त बदल  

मुख्यमंत्र्याच्या स्वागतासाठी आले अन दंड भरुन गेले


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Accicent on Ghansawangi Ambad Road Jalna News