वेग वाढला... अपघात वाढले...

accident
accident

लातूर : शहर आणि जिल्ह्यात अपघातांची मालिका पाहायला मिळत आहे. या वाढत्या अपघातांमुळे जानेवारी ते मार्च या तीन महिन्यात गंभीर स्वरूपाचे १८५ अपघात झाले असून त्यात तब्बल ८१ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. मागील वर्षाच्या तुलणेेने अपघाताचा आलेख वाढत असल्याचे चित्र प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) जाहीर केले आहे. त्यामुळे वाहनचालकांना ‘अति घाई, संकटात नेई’ची आठवण करून देण्याची वेळ आली आहे.

शहर परिसर आणि जिल्ह्याच्या काही भागात रस्त्यांची कामे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. काही भागात डागडूजी करून खड्डेही भरून घेण्यात आले आहेत. त्यामुळे वाहनांचा वेग वाढला अाहे. परिणामी, अपघातांचे प्रमाणही वाढले आहे. यात सर्वाधिक अपघात हे दुचाकीचे आहेत. वाहनांची समोरासमोर धडक बसल्याने झालेले अपघात यात जास्त आहेत. त्यामुळे जानेवारी ते मार्च या तीन महिन्यात १०९ जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघातामुळे काहींना कायमचे अपंगत्वही आलेले आहे. त्यामुळे वाढत्या वेगाला लगाम घालण्याची आवश्‍यकता निर्माण झाली आहे.

जानेवारी ते मार्च या तीन महिन्यातील दोन्ही वर्षांची आकडेवारी
                      २०१८      २०१९

- अपघातांची संख्या : १४७    :  १८५ 
- अपघातातील मृत्यू  :  ५०    :  ८१
- गंभीर जखमी :     ९०    :  १०९

शहर परिसरात आणि जिल्ह्यात २०१८च्या तुलनेने यंदा अपघातांची संख्या आणि अपघातात मृत्यू होणाऱ्यांचे प्रमाण जवळजवळ ३१ टक्क्यांनी वाढले आहे. वाहनांचा वाढता वेग हे यामागील प्रमुख कारण आहे. त्यामुळे वाहनचालकांनी अधिक जबाबदारीने आणि नियमांचे पालन करीत वाहन चालवणे गरजेचे आहे.
- संजीव भोर, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com