औरंगाबाद - करमाडजवळ विचित्र अपघात, सात जण जखमी

संतोष शेळके
सोमवार, 19 मार्च 2018

करमाड (औरंगाबाद) : औरंगाबाद-जालना रस्त्यावर करमाडजवळ मशिनरी घेऊन जात असलेल्या कंटेनरचे टायर फुटल्याने कंटेनर समोर खत घेऊन जात असलेल्या ट्रॅक्टरला धडकला.

आज (ता. १९) करमाडचा आठवडे बाजार असल्याने रस्त्यालगत कापुस खरेदीसाठी काटा लावलेल्या दुकानासमोर काही चारचाकी व काही दुचाकीधारक कापुस विक्री करण्यासाठी आले होते. याचवेळी धडक बसलेला ट्रॅक्टर या दुकाना समोरील उभ्या वाहनांना व बाजुच्या टरबुजाच्या दुकानास जाऊन धडकल्याने या विचित्र अपघातात कित्येक जण जखमी झाले.

वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. टरबुज फूटल्याने सर्वत्र लाल रंग व काही जखमींचे रक्त सांडल्याने अफवांचे मोठे पेव फुटले आहे. दरम्यान, या ठिकाणी बघ्यांची मोठी गर्दी पाहता नेमके किती जणांना लागले याचा अजुनही अंदाज आलेला नाही. घटनेनंतर अपघातस्थळी वाहनांच्या दोन किलोमीटर पर्यंत रांगा लागल्या. त्यामुळे एका बाजूने पोलिसांनी वाहतुक वळवली. या अपघातात ७ जण जखमी झाल्याचे सांगितले जात आहे. त्यापैकी एकाची प्रकृती गंभीर आहे.

Web Title: Accident at karmad aurangabad 2 injured

टॅग्स