टाटा सुमो गाडीला अपघात, चार भाविक जखमी           

बालाजी कोंडे
शुक्रवार, 27 जुलै 2018

माहूर : गुरूपौर्णिमेनिमित्त माहूरगडावर आलेल्या भाविकांच्या वाहनाचा दत्तमांजरी ता. माहूर येथे शुक्रवारी (ता. 27) सकाळी साडेदहा वाजता अपघात झाला. अपघातामध्ये चार भाविक जखमी झाले आहेत.              

माहूर : गुरूपौर्णिमेनिमित्त माहूरगडावर आलेल्या भाविकांच्या वाहनाचा दत्तमांजरी ता. माहूर येथे शुक्रवारी (ता. 27) सकाळी साडेदहा वाजता अपघात झाला. अपघातामध्ये चार भाविक जखमी झाले आहेत.              

माहूरगडावर शुक्रवारी गुरू पौर्णिमे निमीत्त राज्यातून हजारो भाविक येथे भगवान श्री दत्तप्रभुच्या दर्शनाकरिता दाखल झाले आहेत.                     शुक्रवारी सकाळी शेख फरिद वझरा येथे जात असताना माहूर येथून दहा किलोमिटर अंतरावर असलेल्या दत्तमांजरी गावाजवळ भाविकांच्या चारचाकी वाहन क्रमांक एम एच 34 एम.9521 ला अपघात झाला गाडीने दोन पलट्या घेतल्याने गाडीतील चार भाविक गंभीर जखमी झाले. गंभीर जखमी भाविकांना तातडीने माहूर येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले. वैद्यकिय अधिकारी डॉ. वाघमारे, डॉ. निरंजन केशवे यांनी प्राथमिक उपचार केले. भाविकांच्या डोक्याला मार लागल्याने  अजय आत्राम (वय 24), अमोल धाबेकर (वय 22), लक्ष्मण मडावी (वय 22), योगेश तावाडे (वय 35) सर्व राहणार वागदरा ता.मारेगाव जि. यवतमाळ यांना तातडीने पुढील उपचारा करिता 108 रूग्णवाहीकेने यवतमाळला हलविले आहे.                    

घटनास्थळी पोलीस कर्मचारी प्रभाकर करडेवाड, गजानन कुमरे, प्रकाश देशमुख, अन्सारी यांनी भेट देऊन पाहणी केली आहे. माहूर तालुक्यात सलग दुस-या दिवशीही भाविकांच्या वाहनाला अपघात झाल्याची घटना घडली आहे. गुरुवारी बोलेरो पिकअप गाडीचा अपघात होऊन तिन भाविक ठार झाले होते तर अठरा भाविक जखमी झाले होते.     

Web Title: accident at mahur 4 injured