झाला अपघात; ठोकरली ‘माणुसकी’

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 21 नोव्हेंबर 2018

औरंगाबाद - अपघातग्रस्तांना मदत करणारा देवदूत समजला जातो; पण अपघातानंतर मदतीचा बनाव करून जखमी दुचाकीस्वाराची दुचाकी आणि मोबाईल लंपास करून दोघांनी माणुसकीची लक्तरे वेशीवर टांगली.  

तुकाराम किसन राठोड (वय ४७, रा. शिवशंकर कॉलनी) हे भाजी विक्री करतात. सहा नोव्हेंबरला पहाटे सहा वाजता भाजी खरेदीसाठी ते नेहमीप्रमाणे घरातून निघाले. मोंढा, जाधववाडी येथील बाजारपेठेत जाण्यासाठी त्यांनी सोबत मुलालाही घेतले. दुचाकीवरून ते जळगाव रस्त्यावरील आंबेडकर चौक, सिडको एन- सात येथे पोचले. ऐनवेळी त्यांच्या दुचाकीसमोर अचानक कुत्रा आला.

राठोड गडबडले व ते तोल जाऊन दुचाकीवरून खाली कोसळले. ही घटना पाहताच बाजूने दोघे पळत आले. राठोड यांना ते मदतकर्ते असतील असे वाटले; परंतु दोघांच्या मनात भलतेच होते. त्यांनी मदतीचा बनाव केला खरा; पण मोबाईल हाती पडताच त्यांनी राठोड यांना बाजूला सारून दुचाकी ताब्यात घेतली आणि त्यावरून धूम ठोकली. अपघातग्रस्तांना वाचविण्याचा बनाव करून दोघांनी माणुसकीलाच छेद देत विश्‍वासघात केला. या अपघातात त्यांच्यासह मुलगा जखमी झाला. एका खासगी रुग्णालयात दोघांवर उपचार करण्यात आले. बरे झाल्यानंतर राठोड यांनी सिडको पोलिसांना आपबिती सांगितली. या प्रकरणी त्यांच्या तक्रारीवरून अनोळखी दोघांविरुद्ध गुन्ह्याची नोंद झाली.

Web Title: Accident mobile theft Humanity