भयंकर! पुण्याला जाताना अख्खी बस जळाली, पण प्रवाशांचं नशीब बलवत्तर

निसार शेख
शुक्रवार, 27 डिसेंबर 2019

सर्वांना शांततेत बसखाली उतरवण्यात आले. सर्व प्रवाशी सुखरूप बाहेर आल्यानंतर बस धडाडून पेटली. काही वेळातच संपूर्णपणे बस जळून खाक झाली. 

कडा (जि. बीड) : नांदेड ३४ प्रवासी घेऊन येथून पुण्याच्या दिशेने जात असलेल्या शर्मा ट्रॅव्हल्सच्या लक्झरीला मध्यरात्री अचानक आग लागली. या भीषण अपघातात लक्झरी बस पूर्णपणे जळाली असली, तरी या बस मधील सर्व प्रवाशी सुखरूप आहेत.

आष्टी तालुक्यातील बीड-धामणगाव-अहमदनगर मार्गावरील सांगवी पाटण येथे शुक्रवारी (ता २७) च्या मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली. मध्यरात्र उलटून गेल्यानंतर या मार्गावर फक्त मालवाहू वाहने आणि रात्रीच्या धावणाऱ्या ट्रॅव्हल्सचीच चलती असते. त्यातच बसला आग लागली. 

Image may contain: sky and outdoor

अशी घडली घटना

आष्टी तालुक्यातील सांगवी पाटण येथे शुक्रवारी पहाटे दोन वाजता प्रवाशांनी भरलेली एम एच २०-९६३० ही शर्मा ट्रॅव्हल्सची लक्झरी बस नांदेडवरून पुण्याला जात असताना बसमध्ये प्रथमतः धूर निघाल्याचे चालकाच्या लक्षात आले. चालकाने बस बाजूला घेताच प्रवाशामध्ये एकच गोंधळ उडाला.

Image may contain: sky and outdoor

मात्र, सर्वांना शांततेत बसखाली उतरवण्यात आले. सर्व प्रवाशी सुखरूप बाहेर आल्यानंतर बस धडाडून पेटली. काही वेळातच संपूर्णपणे बस जळून खाक झाली. 

हेही वाचा -  सहा महिन्याचं बाळ आईच्या कुशीत होतं.....पण काळही आला अन् वेळही आली...
घटनेची माहिती मिळताच कडा पोलीस चौकीचे कर्मचारी बंडू दुधाळ, आगलावे, वाहनचालक पठाण घटनास्थळी पोहोचले. या बसने का पेट घेतला, त्याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. बस चालक अशोक कचरू बोराडे (रा. परभणी) यांना पोलीस ठाण्यात आणले असून, आष्टी पोलीस ठाण्यात तपास सुरू आहे. 

Image may contain: sky and outdoor

एकाच तालुक्यात आज दोन अपघात

चालकाचा कारवरील ताबा सुटल्याने कार झाडावर जाऊन आदळली. या भीषण अपघातात चालकाचा जागीच मृत्यू झाला, तर दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. बीड-नगर राज्यमार्गावर तालुक्यातील पोखरी गावाजवळ हा अपघात झाला.

अरे बाप रे - Video : असा गेला सहा जणांचा जीव, एक दुचाकीस्वाराला वाचविण्याच्या नादात

विशाल ऊर्फ बंटी काकासाहेब पवार (वय 30 वर्षे, रा. जामखेड), पवन गायकवाड (वय 31 वर्षे, रा. जातेगाव) व आकाश अभिमन्यू उगले (वय 32 वर्षे, रा. जामखेड) हे तिघे तरूण कारने (क्र. एमएच16 एक्यू5050) शुक्रवारी (ता. 27) पहाटे जामखेड येथून नगरकडे निघाले होते. 

Image may contain: car, outdoor and nature

नगर-बीड राज्य मार्गावर तालुक्यातील पोखरी गावाजवळील पुलावर चालक विशाल पवार याचा कारवरील ताबा सुटल्याने कार पुलाजवळ रस्त्याच्या खाली उतरून झाडावर जाऊन आदळली. या अपघातात विशाल पवार याचा जागीच मृत्यू झाला. तर पवन गायकवाड व आकाश उगले हे दोघे गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारांसाठी नगर येथे हलविण्यात आले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Accident on Nanded Pune Road Near Kada Ashti in Beed District