उसाच्या ट्रॅक्टरला टॅ्व्हल्सने असे केले ओव्हरटेक, की... : पहा Photos

कमलेश जाब्रस
सोमवार, 30 डिसेंबर 2019

  • अपघातात दहा प्रवासी झाले जखमी
  • सिध्देश्वर नगर जवळील घटना

माजलगांव : राष्ट्रीय महामार्ग कल्याण - विशाखापट्टणम हा चांगला महामार्ग झाल्याने व पुणे - मुंबईचे अंतर काही तासातच गाठता येत असल्याने या रस्त्यावरून बीड - परभणी - नांदेड या तीनही जिल्ह्यांतून मोठ्या प्रमाणावर टॅ्व्हल्सची वाहतुक सुरू असते.

दोन दिवसांपूर्वीच गंगामसला फाट्याजवळ टॅ्व्हल्स - कारच्या अपघातात तिघा जणांचा मृत्यू झालेली घटना ताजी असतांनाच आज सोमवारी (ता. 30) पहाटे उसाने भरलेल्या टॅ्क्टरला ओव्हरटेक करतांना झालेल्या धडकेत टॅ्व्हल्समधील दहा जण जखमी झाल्याची घटना घडली आहे.

beed

शहरापासून सात किमी अंतरावर असलेल्या सिध्देश्वर नगर जवळील जय महेश कारखान्याला उस पुरवठा करणारे ट्रॅक्टर (क्रमांक एम. एच. 21 बी. एफ. 2706) जात होते. यावेळी नांदेडहून शर्मा ट्रॅव्हल्स पुण्याला जाण्यासाठी भरधाव वेगाने येत होती. ट्रॅक्टरला ओव्हरटेक करताना ट्रॅव्हल्स ट्रॅक्टरला धडकून शेजारील लिंबाच्या झाडावर जाऊन जोरदार आदळली. 

आज काय होणार - माजलगाव पंचायत समितीवर वर्चस्व कुणाचे?

सुदैवाने या अपघातात कुठलीही जिवीत हानी झालेली नाही. तर ट्रॅव्हल्समधील दहा प्रवासी किरकोळ जखमी झाले. तर यातील जखमींवर प्राथमिक उपचार माजलगांव ग्रामीण रूग्णालयात करण्यात आले. तात्काळ दुस-या ट्रॅव्हल्समध्ये बसून प्रवाशांना पुणे येथे रवाना करण्यात आले.

Image may contain: outdoor and nature

शेतकऱ्याच्या उसाचे नुकसान

ट्रॅक्टरला ओव्हरटेक करतांना झालेल्या ट्रॅक्टर - ट्रॅव्हल्सच्या आपघात नाथ्रा येथून हार्वेस्टरने कापणी करून आणलेल्या उसाचे मात्र नुकसान झाले. या उसावरून मोठ्या प्रमाणावर गाड्यांची वाहतूक झाल्याने उस कारखान्याला पुरवठा करण्या आधीच नुकसान झाले आहे.

वाचा - बाळू आता चक्की पिसिंग...

ट्रॅव्हल्स भरधाव वेगाने जात असल्याने दिवसेंदिवस अपघाताचे प्रमाण वाढतच चालले आहे. ट्रॅव्हल्सला वेगमर्यादा नसल्याने व रस्ते चांगले झाल्याने प्रत्येक गाडी वेगाने चालते. अपघातावर अंकुश ठेवण्यासाठी वेगमर्यादा आवश्यक आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Accident Near Majalgaon Beed Breaking News