बिअरच्या बाटल्या घेऊन जाणारा ट्रक उलटला अन् तळीरामांनी ताव मारला

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 26 मे 2019

या ट्रकमध्ये जवळपास पंचवीस ते तीस लाखाची दारू असल्याचे कळते पोलिस प्रशासनाने सांगितले. या ट्रकमध्ये किंगफिशर या कंपनीच्या बिअरचे दीड हजार बॉक्स होते.

नांदेड : मालेगाव ते वसमत रोडवर गिरजा नदीलगत औरंगाबादहून आंध्र प्रदेशकडे बिअरच्या बाटल्या घेऊन जाणारा ट्रक रस्त्याच्या कडेला पलटला. यावेळी ट्रक पलटी होताच अनेक तळीरामांनी मात्र या बाटल्या लांबविल्या.

मालेगाव ते वसमत रोडवर गिरीजा नदी परिसरात औरंगाबादहून आंध्र प्रदेशकडे बिअरची वाहतूक करणाऱ्या ट्रक (एम.एच. 21 एक्स 5411) हा ट्रक पलटला, लोकांनी यावेळी बॉक्स लंपास केले. सदर घटना पोलिस प्रशासनास कळताच याठिकाणी पोलिस कॉन्स्टेबल शेख मजाज, किशोर हुंडे, पोलिस मित्र सुनील एंडके हे घटनास्थळी पोहोचताच त्यांनी सदरील लूट थांबली.

या ट्रकमध्ये जवळपास पंचवीस ते तीस लाखाची दारू असल्याचे कळते पोलिस प्रशासनाने सांगितले. या ट्रकमध्ये किंगफिशर या कंपनीच्या बिअरचे दीड हजार बॉक्स होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: accident near Nanded