गिलोरी फाटा वळण रस्त्यावर जीपच्या झालेल्या अपघातात एक ठार तीन जखमी

अपघातामधील जखमींना उपचारासाठी हिंगोली येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी पाठविले
accident
accident sakal

हिंगोली : हिंगोली तालुक्यातील नर्सी- सेनगाव राज्य रस्त्यावरील नर्सी नामदेव येथून जवळच असलेल्या गिलोरी फाटा वळणावर भरधाव जीपचे नियंत्रण सुटल्याने झालेल्या भीषण अपघातामध्ये एकजण जागीच ठार तर तीन जण गंभीर जखमी झाल्याची घटना शनिवारी रात्री १२:०० वाजताच्या सुमारास घडली आहे.

चिकलठाणा औरंगाबाद येथून स्कोडा जीप क्रमांक एम एच २० एफ वाय ५९०१ हे वाहन हिंगोली येथे लग्न समारंभ कार्यक्रमासाठी येत होते. सदरील वाहन गिलोरी फाटा वळण रस्त्यावर आले असता या ठिकाणी जीप चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने जीप वाहन काही पलट्या घेत बाजूच्या शेतामध्ये अपघातग्रस्त होऊन कोसळले या भीषण अपघातात संदीप जनार्धन वानखरे रा.चिखलठाणा औरंगाबाद हा ठार झाला तर इतर तीनजण गंभीर जखमी झाले आहेत सदरील घटनेची माहिती मिळताच नर्सी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अशोक कांबळे यांनी घटनास्थळी भेट देऊन अपघातामधील जखमींना उपचारासाठी हिंगोली येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी पाठविले. जखमीची नावे मात्र कळाली नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com