ट्रक-दुचाकी धडकेत आजी, नातवाचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 19 मार्च 2017

पाडोळी (आ.)- ट्रकने धडक दिल्याने दुचाकीवरील आजी व नातवाचा जागीच मृत्यू झाला. समुद्रवाणी (ता. उस्मानाबाद) पाटीजवळ शनिवारी (ता. 18) सकाळी अकराच्या सुमारास हा अपघात झाला.

पाडोळी (आ.)- ट्रकने धडक दिल्याने दुचाकीवरील आजी व नातवाचा जागीच मृत्यू झाला. समुद्रवाणी (ता. उस्मानाबाद) पाटीजवळ शनिवारी (ता. 18) सकाळी अकराच्या सुमारास हा अपघात झाला.

समुद्रवाणी तांडा येथील अंबादास भगवान पवार हे आई, पुतण्याला दुचाकीवरून (एमएच- 03, जे- 5981) समुद्रवाणी येथील रुग्णालयात गेले होते. उपचार करून ते परतत होते. समुद्रवाणी पाटीजवळ वळण घेऊन औसा रस्त्यावर आल्यानंतर त्यांच्या दुचाकीला ट्रकने (एमएच- 25, बी- 9248) जोरात धडक दिली. त्यात दुचाकीवर मागे बसलेली अंबादास यांची आई इंदूबाई भगवान पवार (वय 45), पुतण्या नागेश्वर अमोल पवार (दीड वर्ष) यांचा जागीच मृत्यू झाला. बेंबळीचे पोलिस नाईक एन. एस. सुरवसे, हेडकॉन्स्टेबल एच. एस. चव्हाण घटनास्थळी दाखल झाले. दोघांचे मृतदेह पाडोळी (आ.) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठविले. अंबादास पवार यांच्या फिर्यादीवरून ट्रकचालकाविरुद्ध बेंबळी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

Web Title: accident in osmanabad