नांदेडजवळ एसटी बस अपघातात सोळा जण जखमी 

प्रल्हाद कांबळे
शनिवार, 16 जून 2018

नांदेड : नांदेड- देगलूर जाणाऱ्या एसटी महामंडळाच्या बसला धनेगाव चौकात अपघात झाला. यात सोळा प्रवाशी जखमी झाले असून त्यापैकी दोघांची प्रकृती गंभीर असल्याचे रुग्णालय सुत्रांनी सांगितले. हा अपघात शनिवारी (ता. 16) सकाळी सातच्या सुमारास घडला. 

राज्य परिवहन महामंजळाची बस क्रमांक एमएच 14- बीटी- 1567 ही नांदेड आरागाची बस देगलूरकडे शनिवारी सकाळी मध्यवर्ती बसस्थानकातून निघाली. शहरातून काही अंतरावर गेल्यानंतर धनेगाव चौकात चालकाचा बसवरील ताबा सुटला व बस रस्त्याच्या कडेला पलटली. यात भाऊराव देवराव, मोहम्मद आजम, गणेश इबितवार, शंकर माधवराव, गंगाधर देशमुख, किसन नामवाड, संभाजी शिंदे, हनमंत पडलवार, पांडूरंग भोंग, सदाशिव पाटील, मारोती वाघमारे, शेख वसीम, माधव देवकरे, जीतु वाघमारे, शिलाबाई मंडाले आणि यनमुनाबाई वाडेकर हे प्रवाशी जखमी झाले. सर्व जखमीवर नांदेडच्या शासकिय रूग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघात घडल्यानंतर या मार्गावरील वाहतुक विस्कळीत झाली होती. नांदेड ग्रामिण पोलिसांनी व एसटी प्रशानानी घटनास्थळ गाठून जखमींना रूग्णालयात पाठविले. 

Web Title: accident of st near nanded 16 injured