बीड : दोन दुचाकींची धडक; शिक्षक ठार

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 30 November 2019


उपचारासाठी औरंगाबाद येथे हलवले

गेवराई  (जि. बीड) - दोन दुचाकींची समोरा - समोर जोराची धडक होऊन झालेल्या अपघातात शिक्षक जागीच ठार झाल्याची घटना आज (शनिवारी) तालुक्यातील उमापूर - धोंडराई रस्त्यावरील रामनगर तांडा येथे घडली. संजय मारोती गीते (वय ४५) असे अपघातात ठार झालेल्या शिक्षकाचे नाव आहे.

संजय गीते हे येथील महात्मा फुले माध्यमिक विद्यालयात शिक्षक होते. धोंडराई कॅम्प येथून सकाळी दहाच्या सुमारास ते आपल्या दुचाकीवरून (एमएच २३ एम ४०९७) गेवराईकडे येत होते. यावेळी त्यांच्या दुचाकीची आणि समोरून येणाऱ्या दुचाकीची (एम. एच. २३ एझेड ५७५१) जोराची धडक झाली.

यात संजय मारोती गीते यांना जबर जखम होऊन त्यांचा मृत्यू झाला. तर, समोरील दुचाकीवरील रितेश हाराळे हा युवक गंभीर जखमी आहे. त्याला उपचारासाठी औरंगाबाद येथे हलवण्यात आले.

 

संबंधित बातमी -  औरंगाबाद : मृत्यूनेही त्यांना गाठले सोबतच, जालन्याचे चार तरुण अपघातात ठार

उघडून तर पाहा -  मृत्यू होतो म्हणजे नेमके काय होते? कसे येते मरण, वाचा

काय सांगता ? - एचआयव्हीच नव्हे तर शरीर संबंधातून होतात हे दहा गंभीर आजार


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Accident Teacher Dies at Umapur dist Beed