जालना - दोन ट्रकची जोरदार धडक

दिलीप दखने
गुरुवार, 17 मे 2018

वडीगोद्री (जालना) : अंबड तालुक्यातील वडीगोद्रीजवळ सुसाट वेगाने धावणाऱ्या दोन ट्रकची गुरुवारी (ता. 17) दुपारी धडक झाली. यामध्ये कोणतीही जीवित हानी झाली नाही.

वडीगोद्रीजवळ तन्वी कंन्स्ट्रकशनचा सुसाट वेगाने धावणारा ट्रक व बीडकडून औरंगाबादकडे कोल्ड ड्रिंक घेऊन जाणारा ट्रक यांच्यात धडक झाली. तन्वी कंन्स्ट्रकशनचा ट्रक (क्र. एम.एच.16 सी.सी.1661) चालक विष्णू जाधव,(रा.पाथरवाला बुद्रुक) याने अचानक ब्रेक लावल्याने पाठीमागून येणाऱ्या आयशरचा (क्र. एम.एच.20 ए.टी.8329) चालक राजू सय्यद याचा वेगावर ताबा न राहिल्याने हायवावर धडकला. यात ट्रकचे नुकसान झाले आहे.

राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू असल्याने या रस्त्यावर अपघात होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. त्यात सुसाट वेगाने धावणारे वाळू व मुरूम वाहून नेणाऱ्या हायवा यांच्यावर कशाचेही नियंत्रण नाही. त्यामुळे वाहन चालकांना आपला जीव मुठीत धरून रस्त्यावर वागावे लागते.

Web Title: accident of two trucks in jalna