औरंगाबाद-जळगाव महामार्गावर तिहेरी अपघात 

नवनाथ इधाटे
बुधवार, 17 ऑक्टोबर 2018

फुलंब्री : औरंगाबाद-जळगाव महामार्गावर कार, क्रुझर व दुचाकीच्या झालेल्या तिहेरी अपघातात दोन जण गंभीर जखमी झाले असून सात जण किरकोळ जखमी झाल्याची घटना मंगळवारी (ता.16) सायंकाळी साडे पाच वाजेच्या दरम्यान घडली. वनिता उमेश सुरडकर व संतोष नलावडे हे दोन जण गंभीर जखमी झालेल्यांची नावे आहे. या अपघाताची फुलंब्री पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आलेली आहे. 

फुलंब्री : औरंगाबाद-जळगाव महामार्गावर कार, क्रुझर व दुचाकीच्या झालेल्या तिहेरी अपघातात दोन जण गंभीर जखमी झाले असून सात जण किरकोळ जखमी झाल्याची घटना मंगळवारी (ता.16) सायंकाळी साडे पाच वाजेच्या दरम्यान घडली. वनिता उमेश सुरडकर व संतोष नलावडे हे दोन जण गंभीर जखमी झालेल्यांची नावे आहे. या अपघाताची फुलंब्री पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आलेली आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी कि, औरंगाबाद-जळगाव या राष्ट्रीय महामार्गाच्या रस्त्याचे काम केल्या काही दिवसापासून सुरु आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला गुत्तेदारांनी मनमानी पद्धतीने खोदकाम केल्याने रस्ता अरुंद झाला असून रस्त्याच्या दोन्ही बाजूस चार-पाच फुट रस्ता खाली-वर झालेला आहे. त्यामुळे मंगळवारी साडेपाच वाजेच्या सुमारास कार एम.एच.43, ए.एल.0459 फुलंब्रीकडून औरंगाबादच्या दिशेने चालली होती. भरधाव कारचे समोरील एका बाजूचे टायर फुटल्याने कार चालकांनी प्रसंग अवधान साधून कार आटोक्यात आणली. परंतु कार आटोक्यात आली तेव्हा विरुद्ध दिशेला कार जाऊन उभी राहिली. त्याचवेळी क्रुझर एम.एच.04 सी.जी.7868 समोरून येणाऱ्या चालकाचे नियंत्रण सुटल्याने क्रुझर गाडी रस्त्याच्या चार-पाच फुट झाली जाऊन कोसळली. त्याचवेळी औरंगाबादहून फुलंब्रीच्या दिशेला येणारी शाईन एम.एच.20 ई.पी.7981 हि दुचाकी सुद्धा रस्त्याच्या चार-पाच फुट खाली कोसळली.

या तिहेरी अपघातात वनिता उमेश सुरडकर (नवजीवन कॉलनी, औरंगाबाद) व संतोष नलावडे (रा.दरेगाव, बाजारसावंगी ता.खुलताबाद) हे दोघे गंभीर जखमी झाले आहे. तर वैशाली प्रदीप पाटील, अक्षय प्रदीप पाटील,(दोघेही रा.पुणे) गीता अरुणकुमार अवस्थी (रा.लखनऊ), उमेश मनोहर सुरडकर,वैष्णवी उमेश सुरडकर, श्रावणी उमेश सुरडकर (सर्व जन रा.नवजीवन कॉलनी, औरंगाबाद), लक्ष्मण खुटे (रा.दरेगाव, बाजारसावंगी ता.खुलताबाद) यांच्यासह आदी जखमी झाले होते. या तिहेरी अपघाताची माहिती मिळताच महात्मा फुले रुग्णवाहिकेचे चालक विजय देवमाळी यांनी जखमींना फुलंब्री ग्रामीण रुग्णालयात तर उर्वरित जखमींना औरंगाबाद येथील रुग्नालयात दाखल केले. तोपर्यंत पोलिस उपनिरीक्षक गणेश राऊत, पोलिस कॉन्स्टेबल संतोष चव्हाण यांनी घटनास्थळी धाव घेऊन वाहतूक सुरळीत केली. पुढील तपास पोलिस निरीक्षक सम्राटसिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

Web Title: accidents on the Aurangabad-Jalgaon highway