बलात्कार प्रकरणातील आरोपीस अटक 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 20 ऑगस्ट 2018

माजलगाव (जि. बीड)  - माजलगाव शहरातील अकरावीत शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीवर बलात्कार प्रकरणात रविवारी (ता. 19) मुख्य आरोपी आशिष बोरा यास पुण्यातून, तर अन्य दोघांना माजलगावातून पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यातील एक महिला आरोपी अद्यापही फरारी आहे. महाविद्यालयामध्ये संबंधित पीडित विद्यार्थिनीची आशिषबरोबर ओळख झाल्यानंतर त्याचा गैरफायदा घेत त्याने महाविद्यालयासमोरच असणाऱ्या फोटो स्टुडिओमध्ये तिच्यावर अत्याचार केले व याची क्‍लिप बनवून ब्लॅकमेल करू लागला. यानंतर तीन ऑगस्टला या महाविद्यालयाच्या प्रांगण्यात आशिषसह पीडित मुलीने उंदीर मारण्याच्या गोळ्या खाऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता.

माजलगाव (जि. बीड)  - माजलगाव शहरातील अकरावीत शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीवर बलात्कार प्रकरणात रविवारी (ता. 19) मुख्य आरोपी आशिष बोरा यास पुण्यातून, तर अन्य दोघांना माजलगावातून पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यातील एक महिला आरोपी अद्यापही फरारी आहे. महाविद्यालयामध्ये संबंधित पीडित विद्यार्थिनीची आशिषबरोबर ओळख झाल्यानंतर त्याचा गैरफायदा घेत त्याने महाविद्यालयासमोरच असणाऱ्या फोटो स्टुडिओमध्ये तिच्यावर अत्याचार केले व याची क्‍लिप बनवून ब्लॅकमेल करू लागला. यानंतर तीन ऑगस्टला या महाविद्यालयाच्या प्रांगण्यात आशिषसह पीडित मुलीने उंदीर मारण्याच्या गोळ्या खाऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता. औरंगाबादेत वेळीच उपचार केल्याने दोघेही वाचले होते. 

Web Title: accused arrested in the rape case