बेड्यांसह आरोपी फरार

Crime
Crime

औरंगाबाद - हद्दपार असलेला एक सराईत गुन्हेगार बेड्यासह पोलिस आयुक्तालयातून पोलिसांना चकमा देत पळाला. पोबारा केलेल्या आरोपीच्या हातातील तुटलेल्या बेड्या मध्यवर्ती बसस्थानकावर शुक्रवारी (ता. नऊ) सकाळी सापडल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. पाशा शेख नईम ऊर्फ चांद (वय ३५) असे पळालेल्या आरोपीचे नाव आहे. गस्तीवरील गुन्हे शाखेच्या पथकाने शेख याला गुरुवारी (ता. आठ) सेंट्रल नाका भागातून ताब्यात घेतले होते. रात्रभर आयुक्तालयात गुन्हेशाखेच्या ताब्यात ठेवण्यात आले. शुक्रवारी (ता. नऊ) सकाळी ड्यूटी बदलायच्या वेळेत संधी साधत त्याने आयुक्तालयातून पळ काढला. दरम्यान, मध्यवर्ती बसस्थानकात नऊच्या सुमारास तुटलेल्या बेड्या सापडल्या. त्यानंतर हा प्रकार लक्षात आला. या प्रकरणी पोलिस शिपाई शिवाजी भोसले यांच्या तक्रारीवरून क्रांती चौक पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक चव्हाण तपास करीत आहेत. 

सुरक्षेवर प्रश्‍नचिन्ह 
शेख हा शहरातील सराईत पाकिटमारी आणि चेनस्नॅचर आहे. त्याच्या विरोधात चोरीचे अनेक गुन्हे नोंद आहेत. त्यामुळे त्याच्यावर हद्दपारीची कारवाईही झाली. काही गुन्ह्यांमध्ये तो जामिनावर सुटला होता; मात्र न्यायालयात एकदाही हजर न झाल्याने त्याच्याविरोधात नॉन बेलेबल वॉरंट इश्‍यू करण्यात आले होते. त्याला गुरुवारी गस्तीवरील गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले; मात्र पोलिसांच्या शिफ्ट चेंचमध्ये तो आयुक्तालयातून पसार झाल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे पोलिस आयुक्तालयाच्या बंदोबस्तावर प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com