गोळीबार प्रकरणातील आरोपी घरफोडीतही 

प्रल्हाद कांबळे
बुधवार, 4 डिसेंबर 2019

0- पिस्तुलचा धाक दाखवून खंडणी मागायचे
0- शहर व जिल्ह्यात दहशतीचे वातावरण
0- अनेक गुन्ह्यात सहभागी असल्याची कबुली
0- पाच डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी

नांदेड : येथील कॉंग्रेसचे पदाधिकारी गोविंद कोकुलवार यांच्यावर केलेल्या गोळीबार प्रकरणातील आरोपीचा सहभाग एका मोठ्या घरफोडीत असल्याचे खुद्द आरोपीनेच कबुली दिली. यावरून त्याला भाग्यनगर पोलिसांनी न्यायालयासमोर मंगळवारी (ता. तीन) हजर केले असता न्यायाधिश मयुरा यादव (ठाकूर) यांनी पाच डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडीत पाठविले आहे. 

चौफाळा भागातील गोविंद कोकुलवार यांच्यावर पिस्तुलातून गोळीबार करून त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीना पोलिसांनी अटक केली. त्यातील काही आरोपी नांदेड कारागृहात आहेत. तर फरार असलेल्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानी नागपूर परिसरातून नजिमोद्दीन उर्फ गुड्डू याला व त्याच्या एका साथिदाराला अटक केली होती. हे दोन्ही आरोपी पोलिस कोठडीत होते. याच आरोपींनी पत्रकार केशव घोणसे पाटील यांना पाच लाखाची खंडणी मागितली होती. गोविंद कोकुलवार प्रकरणाची पोलिस कोठडी संपताच वजिराबाद पोलिसांनी घोणसे पाटील प्रकरणात त्यांना आपल्या ताब्यात घेतले. त्यांनीही पोलिस कोठडीत पाठविले. 

५२ लाखाच्या घरफोडीची कबुली

तपासात अटक आरोपी गुड्डू सय्यद आणि शेख निहाल यांनी भाग्यनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या सन्मित्र कॉलनी येथे धाडशी घरफोडी केली होती. ता. चार सप्टेंबर रोजी सेवानिवृत्त अभियंता लक्ष्मणराव व्यंकटेश भरडे यांचे कुटूंब हैद्राबाद येथील नातेवाईकांकडे गेले होते. ते घरी एकटेच होते. मध्यरात्री या चोरट्यांनी चारचाकी वाहनातून येऊन त्यांचे घर फोडले. यावेळी लक्ष्मण भरडे हे ज्या खोलीत झोपले होते त्या खोलीची कडी बाहेरून लावली होती. कपाटातील व तिजोरीतील ५१ लाख ८५ हजाराचा सोन्या- चांदीचे दागिणे व रोख रक्कम असा एवज लंपास केला होता. घरफोडीचा सर्व कारनामा सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाला होता. त्यात सय्य्द गुड्डू व शेख निहाल हे स्पष्ट दिसत होते.

गुड्डूच्या फरार साथिदाराला अटक करणे आहे

मात्र हे दोघेही फरार होते. त्यातील गुड्डूला अटक केल्यानंतर लक्ष्मण भरडे यांच्याकडे चोरी केल्याची कबुली दिली. वजिराबाद पोलिसांची पोलिस कोठडी संपल्यानंतर मंगळवारी गुड्डू सय्यद याला भाग्यनगर पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलिस निरीक्षक अनिरूध्द काकडे यांनी अपल्या सहकाऱ्यांसह त्याला मंगळवारी (ता. तीन) न्यायालयात हजर केले. आरोपी हा अट्टल गुन्हेगार असून त्याची चौकशई व त्याचा फरार असलेला आरोपीला पकडायचे आहे. त्याचा पत्ता व इतर माहिती घेण्यासाठी आरोपी गुड्डू याला पोलिस कोठडी द्यावी अशी विनंती पोलिसांनी न्यायालयाला केली. यावरून न्यायाधिश मयुरा यादव यांनी पाच डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडीत त्याची रवानगी केली आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The accused in the firing case also vandalized