एमपीडीएअंतर्गत एक आरोपी वर्षभरासाठी स्थानबद्ध 

उमेश वाघमारे
रविवार, 7 ऑक्टोबर 2018

शहरासह जिल्ह्यातील रेकॉर्डवरील आरोपींना आळा घालण्यासाठी पोलिस अधीक्षक चैतन्य एस. यांनी या आरोपींची यादी तयार करण्याच्या सूचना पोलिस अधिकाऱ्यांना दिल्या होत्या. रेकॉर्डवरील आरोपींविरोधात हद्दपारी, मोक्का आणि एमपीडीए कायद्याअंतर्गत कारवाई प्रस्तावित करण्याच्या हालचाली पोलिस प्रशासनाने यापूर्वीच सुरु केल्या होत्या.

जालना : महाराष्ट्र झोपडपट्टी दादा प्रतिबंधक कायद्याअंर्तगत जिल्ह्यात पहिल्यांदाच पोलिस प्रशासनाने रेकॉर्डवरील एक आरोपी विरोधात एक वर्ष स्थानबद्धची कारवाई केली आहे. ऋषी भगवान जाधव (वय 30, रा.कैकडी मोहल्ला, जालना) असे या आरोपीचे नाव आहे. 

शहरासह जिल्ह्यातील रेकॉर्डवरील आरोपींना आळा घालण्यासाठी पोलिस अधीक्षक चैतन्य एस. यांनी या आरोपींची यादी तयार करण्याच्या सूचना पोलिस अधिकाऱ्यांना दिल्या होत्या. रेकॉर्डवरील आरोपींविरोधात हद्दपारी, मोक्का आणि एमपीडीए कायद्याअंतर्गत कारवाई प्रस्तावित करण्याच्या हालचाली पोलिस प्रशासनाने यापूर्वीच सुरु केल्या होत्या. यापैकी जिल्ह्यात पहिली एमपीडीए कायद्याअंतर्गत एका आरोपी विरोधात कारवाई करण्यात आली आहे. 

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर व त्यांच्या पथकाने पोलिस अधीक्षक चैतन्य एस. यांच्या मार्गदर्शनाखाली ऋषी भगवान जाधव या रेकॉर्डवरील आरोपी विरोधात एमपीडीए कायद्याअंतर्गत जिल्ह्याधिकारी रविंद्र बिनवडे यांच्याकडे प्रस्ताव दाखल केला होता. जिल्हाधिकार यांनी हा प्रस्ताव मंजूर करुण आरोपी ऋषी जाधव याला एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्याचे आदेश दिले. त्यानंतर रविवारी (ता. 7) स्थानिक गुन्हे शाखेने आरोपी ऋषी जाधव याला औरंगाबाद येथील हर्सुल मध्यवर्ती कारागृहात पाठविन्यात आले आहे.

ही कारवाई पोलिस अधिक्षक चैतन्य एस., अपर पोलिस अधीक्षक समाधान पवार, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर, किशोर बोर्डे, उपनिरीक्षक जयसिंग परदेशी, कर्मचारी हरीश राठोड, संतोष सावंत, सँम्युअल कांबळे, समाधान तेलंगे, कृष्णा तंगे, सचिन चौधरी, विलास चेके, परमेश्वर धूमाळ, लाखन पाचलोरे, विष्णु कोरडे, योगेश जगताप आदीनी केली.
 

Web Title: A accused localized for a year under MPDA