उदगीरमधील खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीस कर्नाटकच्या जंगलातून अटक

आरोपीस अटक
आरोपीस अटकई सकाळ

उदगीर (जि.लातूर) : डोळे वटारून का बघतोस ? म्हणुन रेल्वेस्टेशन रोड बस्वेश्वर चौकात (Udgir) झालेल्या शाब्दिक बाचाबाचीतून जगदीश किंवडे याच्या पोटावर धारदार शस्त्राने पोटावर वार करुन खुन करण्यात आला होता. खुनाच्या (Crime In Latur) गुन्ह्यातील फरार आरोपी सोन्या ऊर्फ अमित नाटकरे यास सोमवारी (ता.दोन) कर्नाटकाच्या जंगलातून अटक करण्यात आले आहे. पोलिसाकडून मिळालेली माहिती अशी, की गुन्ह्यातील फरार आरोपींना अटक करण्याकरिता पोलिसांचे पथके आरोपीच्या शोधासाठी वेगवेगळ्या भागात रवाना करण्यात आले होते. शुक्रवारी (ता.३०) आरोपी सोन्या नाटकरे हा मोघा रेल्वे मार्गावर पायी फिरत असल्याची माहिती मिळाली. त्यावरून विशेष पथकांना त्या भागात पाठविण्यात आले होते. पथकांनी त्या ठिकाणी जाऊन फरार आरोपीचा शोध घेतला असता तो रावणगाव येथून त्याचा नातेवाईक गणेश उत्तमराव झेले याला सोबत मोटारसायकलने आरोपीच्या बहिणीचे गाव मुडबी (ता.बस्वकल्याण, राज्य कर्नाटक ) (Karnataka) येथे गेल्याचे माहिती मिळाली.

आरोपीस अटक
ठाकरे सरकार vs शिवसेना.. पालघरमध्ये लसींच्या मुद्द्यावर खडाजंगी

त्यावरून पथकांनी फरार आरोपीच्या बहिणीच्या गावी शोध घेतला असता बाजुच्या जंगलाच्या दिशेने गेले असल्याची माहिती मिळाली. जंगलात दिवस-रात्र २० ते २५ किलोमीटर अंतर पायी जावुन फरार आरोपीस मदत करणारा गणेश झेले यास बस्वकल्याणच्या जंगलात तिन दिवसाच्या प्रयत्नानंतर खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीस जेरबंद केले. त्याला उदगीरच्या न्यायालयासमोर हजर केले असता आरोपीस पोलिस कोठडी दिली आहे. गुन्ह्याचा अधिक तपास शहर पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक व्ही.आय.ऐडके हे करित आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com