सुनेला घराबाहेर काढण्यासाठी भावासह मुलांवर अॅसिड हल्ला

acid
acid

माजलगाव : घर विक्रीस काढले आहे तू घराबाहेर निघ असे म्हणत सून, दोन भावांसह लहान मुलांवर अॅसिड फेकून हल्ला केल्याची घटना शहरातील कालिका नगर येथे शुक्रवारी (ता. 3) रात्री घडली. सदरील हल्ला घरगुती भांडणाच्या कारणावरून झाला आहे.

शहरातील कालिका नगर येथील रहिवासी अहमद जैनुद्दीन जरगर व नजीब जैनुद्दीन जर्गर यांच्या घरी इर्शाद जर्गर यान्ना शहरातील बाजार रोड येथील शेख महेबुब यांची मुलगी दिली होती. या उभयतांना आठ वर्षीय व पंधरा वर्षीय अशी दोन मुले असून कुटुंब कालिका नगर येथे एकत्रित कुटुंबात स्वतःच्या घरात राहात आहे परंतु या घरावर कब्जा करून लहान भाऊ इर्शाद जर्गर यांना घराबाहेर काढण्यासाठी अहमद जरगर व नजीब जर्गर यांनी वाद घालून भांडण करण्यास सुरुवात केली यांच्या घराबाहेर हे घर आम्हाला विकायचे आहे असे म्हणून घरातील वाद सोडवण्यासाठी गेलेली महिलेचे भाऊ समीर शेख मेहबूब शेख (वय 35) शे. मकसूद (वय 38), दिना इर्शाद जर्गर (वय 8) व अलशफाद (वय 15) यांसह सुनेवर ऍसिड हल्ला केला.

ही घटना शहरातील कालिका नगर परिसरात शुक्रवारी रात्री साडेनऊच्या दरम्यान घडली असून या हल्ल्यात समीर नावाचा एक युवक गंभीर जखमी झाला असून इतरांवर अॅसिडमुळे इजा झाली आहे. दरम्यान आरोपी विरोधात माजलगाव शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे पुढील तपास पोलीस  निरिक्षक सय्यद सुलेमान हे करत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com