ई-वे बील न बनविणाऱ्या 13 वाहनांवर कारवाई   

प्रकाश बनकर
शुक्रवार, 7 डिसेंबर 2018

औरंगाबाद : ई-वे बील न बनविता मालवाहतूक करणाऱ्यांवर राज्यकर वस्तू व सेवाकर कार्यालयातर्फे करावाई करण्यात येत आहे. शनिवारी व रविवारी (ता.1 व 2) वाहनाची तपासणी करण्यात आली.यात 13 वाहनांनी बील न बनविल्याचे उघड झाल्याने ही वाहने जप्त करण्यात आली आहे. या वाहनधारकाडून 13 लाखाच कर व दंड वसूल करण्यात आला. 

जीएसटीतर्फे 1 व 2 डिसेंबरला औरंगाबाद-धुळे राष्टीय महामार्गावरील दोलताबाद टी पॉईंट येथे जीएसटी राज्यकर सहआयुक्त दीपा-मुधोळ-मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यकर उपायुक्त संतोष श्रीवास्तव, धंनजय देशमूख, तुषार गावडे, माधव कुंभारवाड, राज्यकर अधिकारी संदीप नलावडे यांनी ही तपासणी मोहिम राबविली. राज्यांगर्त मालवाहतूकीसाठी 1 लाखापेक्षा जास्त किंमतीच्या मालवाहतूकीसाठी व आंतरराज्यात मालवाहतूकीसाठी 50 हजार पेक्षा जास्त किमतीच्या मालवाहतूकीसाठी ई-वेबील बनविणे कायद्याने बंधनकरक आहे. असे असतानाही या 13 व्यापाऱ्यांनी ई-वे बील न बनवित कर चोरी करण्याचा प्रयत्न केला. यामूळे त्यांच्यावर जीएसटी कार्यालयातर्फे दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे.

Web Title: action on 13 vehicles through e way bill