अवैध दारूविक्रीसह मटका चालविणाऱ्यांवर कारवाई, गुन्हा दाखल

Aurangabad Gramin News
Aurangabad Gramin News

जायकवाडी  (जि.औरंगाबाद) : पैठण एमआयडीसी परिसरात अवैध दारूविक्री, मटका चालविणाऱ्यांवर कारवाई करून 66 हजार 680 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी सहा संशयित आरोपींविरुद्ध पैठण एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. औरंगाबाद ग्रामीणच्या विशेष पथकाने बुधवारी (ता. 27) ही कारवाई केली.


एमआयडीसी पैठण येथील जैन स्पिनर थांबा येथे कागदी चिठ्ठ्या देऊन अवैधरीत्या मटका खेळत असल्याची माहिती या विशेष पथकाला मिळाली. त्यावरून पथकाने दुपारी जैन स्पिनर थांबा येथे कल्याण मटका खेळताना व खेळविताना काहीजण आढळून आले. त्यांच्याकडून मोबाईल, दोन दुचाकी, एक हजार 460 रुपये असा 63 हजारांचा मुद्देमाल जप्त करून आरोपींना ताब्यात घेतले. त्यानंतर इसारवाडी शिवारातील शालिमार हॉटेल येथे रवी सोनवणे, कृष्णा तांबे (दोघेही रा. साखर कारखाना वसाहत) हे देशी दारूची बेकायदेशीररीत्या विक्री करताना आढळून आले.

पोलिसांनी त्यांच्याकडून 46 बाटल्या (किंमत अंदाजे तीन हजार 680 रुपये) जप्त करीत संशयित आरोपीस ताब्यात घेतले. दोन्ही ठिकाणचा एकूण 66 हजार 680 रुपयांचा माल जप्त करीत सहा संशयित आरोपींविरुद्ध पैठण एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक अर्चना पाटील, फौजदार विद्या झिरपे, खंडू मंचरे, संजय सपकाळ, शरद पवार करीत आहेत.

हेही वाचा ः बाेंडअळीचा धाेका टाळण्यासाठी फरदड टाळा !

नागापूर येथील शेतातून म्हशीची चोरी
नागापूर (जि.औरंगाबाद) : नागापूर (ता. कन्नड) येथील शेख इमरोद्दीन शेख मुक्तारोद्दीन यांची शेतात बांधलेली अंदाजे चाळीस ते पंचेचाळीस हजार रुपये किमतीची म्हैस चोरीस गेली आहे. अज्ञात चोरट्यांनी शेतात कोणी नसल्याचा फायदा घेत बांधलेली म्हैस सोडून चोरी केली आहे. म्हैस आणून देणाऱ्यांना पाच हजार रुपयांचे बक्षीस देण्याचे शेख यांनी जाहीर केले.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com