गावठी दारुची विक्री करणाऱ्यावर धडक कारवाई 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 6 जुलै 2018

मुक्रमाबाद पोलिस ठाणे अंतर्गत येत असलेल्या दापका (गुंडोपंत) येथील तांड्याव गेल्या अनेक दिवसापासून रसायन मिश्रीत गावठी विक्री करत असल्याची कुण-कुण मुक्रमाबाद पोलिस ठाण्याला लागली होती.

मुक्रमाबाद - मुक्रमाबाद पोलिस ठाणे यांच्या कडून अवैध दारू विक्रेत्या विरोधात धडक कारवाईला आता सुरवात केली असून शुक्रवार दि. ६ ला सकाळी सहा वाजता पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सुनिल नाईक, यांनी आपल्या पथकासह धाडी टाकून गावठी दारू व रसायने जप्त करून यात पाच जणावर कारवाई केली आहे. 
     
मुक्रमाबाद पोलिस ठाणे अंतर्गत येत असलेल्या दापका (गुंडोपंत) येथील तांड्याव गेल्या अनेक दिवसापासून रसायन मिश्रीत गावठी विक्री करत असल्याची कुण-कुण मुक्रमाबाद पोलिस ठाण्याला लागली होती. तर पोलिस ठाण्याचा नव्यानेच पदभार घेतलेले सुनील नाईक, यांनी बीट जमादार किसन चिंतोरे , माधव जळकोटे, माधव मरगेवाड, रणजीत मुद्दीराज सुमन इंदूरे या पथकाला घेऊन याठिकाणी धाड टाकत येथे चालत असलेल्या गावठी दारूचे आड्डे उद्दवस्त करून रसायन मिश्रीत ७६ लिटर गावठी दारू किंमत सात हजार ६०० रुपये तर ही, गावठी दारू बनविण्यासाठी आणलेले रसायन, मोहफूल अदी २६८ लिटर अकरा हजार ९०० रुपये असा एकूण एकोणीस हजार ५०० रुपयेचा मुद्देमाल जप्त करून ताब्यात घेतले असून यात जिजाबाई जाधव, सुमनबाई राठोड, शिवाजी जाधव, शोभाबाई राठोड, राम जाधव या पाच जणाविरुध्द मुक्रमाबाद पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पुढील तपास बीट जमादार किसनराव चितोंरे हे करीत आहेत.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Action against the seller of liquor at mukramabaad nanded