नांदेडमध्ये उत्पादन शुल्क विभागाचे अवैध धंद्यावर छापे

प्रल्हाद कांबळे
बुधवार, 18 जुलै 2018

राज्य उत्पादन शुल्कचे जिल्हा अधिक्षक निलेश सांगडे यांच्या आदेशावरून विशेष पथकाची नेमणुक करून जिल्हा भरातील अवैध धंद्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी व त्यांच्यावर कारवाईसाठी पथक रवाना करण्यात आले होते.

नांदेड : उत्पादन शुल्कच्या गुन्हे अन्वेषणांतर्गत विशेष पथकाने जिल्ह्यात विविध भागात अवैध धंद्यावर छापे टाकून 24 गुन्हे दाखल करून 15 जणांना अटक केली आहे. त्यांच्याकडून दोन लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे. 

राज्य उत्पादन शुल्कचे जिल्हा अधिक्षक निलेश सांगडे यांच्या आदेशावरून विशेष पथकाची नेमणुक करून जिल्हा भरातील अवैध धंद्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी व त्यांच्यावर कारवाईसाठी पथक रवाना करण्यात आले होते. या पथकांनी जिल्ह्यात वेगवेगळ्या भागात जाऊन छापे टाकले. यात 24 गुन्हे दाखल केले असून त्यापैकी 15 जणांना अटक केली आहे. यातील नऊ जण पोलिस दिसताच आपला मुद्देमाल सोडून पसार झाले.

घटनास्थाळवरून पथकांनी हातभट्टी दारु, देशी, ताडी व रसायन जप्त केले. यात 80 लीटर देशी दारु, 180 लीटर हातभट्टीदारु, ताडी 250 लीटर आणि रसायन 1600 लीटर यासह दारु वाहतुक करणाऱ्या दोन दुचाकीही दोन लाख 5 हजार 780 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात या पथकाला यश आले आहे. निरीक्षक चिलवंतकर, एस. एस. खंडेराय यांच्यासह आदींनी या पथकात सहभाग घेतला होता. या पथकाचे जिल्हाधिकारी व निलेश सांगडे यांनी कौतुक केले आहे. 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

 

Web Title: Action of the excise duty department on Illegal trades in Nanded